‘या’ 9 आजारांवर रामबाण उपाय आहे वेलची ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – आज आपण वेलचीचे शरीराला कोणते फायदे होतात याबद्दल माहिती घेणार आहोत.

1) ज्यांना प्रवासात उलटी होते किंवा मळमळ होते अशांनी वेलचीचे दाणे चघळावेत.

2) एखाद्या वेळी उचकी लागली आणि ती थांबत नसेल तर वेलचीचे दाणे भाजून त्याचे चूर्ण तयार करावे. हे चूर्ण घेतल्यास उचकी थांबते.

3) लघवीतून किंवा योनीतून रक्तस्त्राव होत असेल तर वेलची चूर्णाचा लगेच फायदा होतो.

4) जखमांवर जर वेलची चूर्ण व तूप किंवा खोबरेल तेलाची पट्टी लावली तर जखम लवकर भरून निघते.

5) पोटफुगी या विकारात वेलची हिंगासोबत मिसळून खावी. याने फायदा मिळेल.

6) वेलची मुत्रप्रवृत्ती साफ करते. त्यासाठी डाळींब किंवा दह्यासोबत वेलची चूर्ण खावे.

7) वेलची अत्यंत पाचक आहे. जडान्न, तुपाचे अजीर्ण, सतत ढेकर येणं यासाठी 3-4 वेलची 2 कप पाण्यात उकळून अष्टमांश काढा करून प्यावा.

8) कोणत्याही पदार्थात सुगंधी म्हणून वेलचीचा जसा वापर केला जातो तसाच शरीरात थंडावा आणण्यासाठीही याचा वापर केला जातो.

9) गर्भवती महिलेनं जास्त प्रमाणात वेलची खाऊ नये.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.