‘कोरोना’सह अनेक आजार दूर ठेवतो ओव्याचा काढा, ‘हे’ 8 फायदे आणि कृती जाणून घ्या

सध्या कोरोनाची महामारी संपूर्ण जगभर पसरली आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत आहे, ते कोरोनाला तोंड देण्यात यशस्वी होत आहेत. भारतीय आयुष मंत्रालयानेही कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी काढा पिण्याचा सल्ला दिला आहे. आयुर्वेदात सांगितलेला ओव्याचा काढा कोरोना आणि इतर आजारांवर खुप गुणकारी सिद्ध होऊ शकतो. हा काढा कसा तयार करायचा आणि त्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

असा तयार करा काढा
एक चमचा ओवा, हळद, मध, काळं मीठ, लिंबू किंवा अ‍ॅपल व्हिनेगर, अर्धा लीटर पाणी घ्या. प्रथम एका भांड्यात पाणी उकळवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात हळद आणि ओवा टाका. पाणी उकळून अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा आणि काढा गाळून घ्या. त्यामध्ये लिंबू, काळं मीठ, मध घाला. कोमट झाल्यानंतर सेवन करा.

हे आहेत फायदे
1 शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर पडतात.
2 कफ निघून जातो.
3 पोटाशी संबंधित विकारांवर फायदेशीर.
4 वजन कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर.
5 शरीराची पचन क्षमता वाढते.
6 खोकला दूर होतो.
7 पित्त कमी होते.
8 जुलाब, अतिसारात आराम मिळतो.

ओव्याचे पाणी
एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवावा. सकाळी या पाण्यामध्ये एक चमचा मध घालून हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे. खोकल्यावर हे ओव्याचे पाणी गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. नंतर थोडेसे काळे मीठ घालून सेवन करावे.

* खोकल्यावर अतिशय फायदेशीर आहे.
* पित्ताचा त्रास असेल तर ओवा खा. ओवा, सैधव आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर घ्या.
* पोट साफ होत नसल्यास दररोज दुपारी जेवल्यावर एक ग्लास ताकामध्ये ओव्याची पूड आणि सैंधव टाकून प्या.
* जुलाब, अतिसाराच्या त्रास होत असेल तर दिवसातून दोन वेळा ओव्याचे पाणी प्या.