‘डोकेदुखी’ आणि रक्ताची कमतरता तसेच श्वसनाची समस्या दूर होईल ‘या’ पध्दतीनं, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जीरं आपल्या जेवणाच्या प्रत्येक भाजीत वापरले जाते. जीरं स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा घटक आहे. जीरं वापरल्या शिवाय कोणतीच भाजी पूर्ण होत नाही. तसंच गुळाचा वापरही अनेक पदार्थांमध्ये केला जातो. तुम्ही कधी गुळ आणि जीरं एकत्र खाल्ले आहे का ? खाल्ले नसेल तर आता खाण्यास सुरुवात करा. कारण तुमचा विश्वास बसणार नाही जीरं आणि गुळाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. या दोन्ही पदार्थांच्या एकत्रित सेवनाने आपल्याला कोणते फायदे होतात ते जाणून घ्या.

1. रक्ताची कमतरता भरून निघते
ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा लोकांनी जीरं आणि गुळाचे नियमित सेवन करावे. साधारणपणे गर्भवती असताना महिलांनी या समस्येचा सामना सगळ्यात जास्त करावा लागतो. गुळात मोठ्या प्रमाणावर आयर्न असते. आयर्नच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढता येऊ शकते. जीरं आणि गुळाचे एकत्रित सेवन केल्याने ब्लड सर्क्यूलेशन उत्तम प्रकारे होते.

2. रोगप्रतिकारकशक्ती वाढते
जीरं आणि गुळाचं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आजार होत नाहीत. सर्दी खोकल्याची समस्या दूर होते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे लिव्हरचे आजार होत नाहीत.

3. डोकेदुखी कमी होते
कामाचा किंवा घरातील इतर गोष्टींचा ताण असल्यास बऱ्याच लोकांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. अशा वेळी जीरं आणि गुळाचे पाणी पिल्याने फायदा होते. डोकेदुखीपासून आराम मिळतो.

4. श्वसनाच्या समस्या
बदललेल्या आणि थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी निगडीत आजार होण्याचा धोका अधिक असतो. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही जीरं आणि गुळाच्या पाण्याचे सेवन करु शकता. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे फायबर मोठ्या प्रमाणावर असते. अस्थमा, ब्रोंकायटिस आणि एलर्जी संबंधित आजारांवर गुळाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. याशिवाय जीरं आणि गुळ पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तम ठरते.

असं तयार करा पाणी
एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. यामध्ये दोन ते तीन चमचे गुळाचा चुरा आणि एक चमचा जीरं टाकून चांगले उकळून घ्या. यानंतर हे पाणी कपात घेऊन पिऊ शकता. मात्र लक्षात ठेवा हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेतले तर फायदेशीर ठरेल.