रोज जीरे आणि गुळाच्या पाण्याचं सेवन कराल तर ‘या’ 4 गंभीर आजारांपासून लांब रहाल

पोलिसनामा ऑनलाईन – जीरे आणि गुळ यांच्या सेवनानं शरीराला अनेक आरोग्यादायी फायदे मिळतात. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) रक्ताची कमतरता भरून निघते – ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांना एनिमियाची समस्या असते. गुळात असणाऱ्या आयर्नमुळं शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. जीरे आणि गुळाचं एकत्र सेवन केलं तर शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं.

2) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – जीरे आणि गुळाच्या पाण्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. यामुळं सर्दी खोकलाही दूर होतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकल्यानं लिव्हरचे आजार होत नाहीत.

3) डोकेदुखी – जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल तर गुळ आणि जीऱ्याचं पाणी पिलं तर फायदा मिळेल.

4) श्वसनाच्या समस्या – बदललेल्या आणि थंड वातावरणामुळं सर्दी खोकल्यासोबतच श्वसनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. जीरे आणि गुळाच्या पाण्याचं सेवन केलं तर फायदा मिळतो. गुळातून शरीराला आवश्यक फायबर मोठ्या प्रमाणात मिळतात. इतकंच नाही तर गुळाच्या सेवनाचा अस्थमा, ब्रोंकायटीस आणि अॅलर्जी संबंधित आजारांमध्येही खूप फायदा मिळतो. पचनक्रिया उत्तम राहण्यासाठी गुळ आणि जीऱ्याचा खूप लाभ होतो.

असं तयार करा गुळाचं जीरे आणि गुळाचं पाणी –

– एका भांड्यात 2 कप पाणी घ्या
– यात 2-3 चमचे गुळाचा चुरा आणि 1 चमचा जिरे टाका
– आता हे पाणी उकळून घ्या.
– आता एका कपात घेऊन चहाप्रमाणे याचं सेवन तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा याचं सेवन जर रिकाम्या पोटी केलं तर जास्त फायदा मिळतो.