1 ग्लास हळदीचे पाणी प्यायलात तर सर्दी, खोकल्यासह व्हायरसच्या संसर्गापासून राहाल दूर

पोलीसनामा ऑनलाइन – स्वयंपाक घरात वापरली जाणारी हळद अनेक आजारांवर गुणकारी आहेत. हळदी अनेक औषधी गुणधर्म असल्याने विविध आजारांवर ती लाभदायक ठरते. विशेषता पावसाळ्यात उद्भवणार्‍या आजारांपासून दूर राहण्यासाठी हळदीचे उपाय खुप उपयोगी ठरतात. हळदीच्या पाण्याचे रोज सेवन केल्यास अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. हळदीच्या पाण्याचे कोणते फायदे आहेत जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे

1 पचनक्रिया
हळदीच्या पाण्यामुळे पचन चांगले होते. पोटाच्या आजारांपासून संरक्षण होते. पचनक्रिया उत्तम राहावी यासाठी दररोज हळदीच्या पाण्याचे सेवन करावे.

2 सर्दी, खोकला
हळदीत रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे गुण असल्याने शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात हळद मिसळून या पाण्याचे सेवन करा.

3 सूज
हळदीतील करक्युमिन नावाच्या रसायनामुळे शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. तसेच सांधेदुखी दूर मदत होते.

4 हृदय
हळदीचे पाणी हृदय निरोगी ठेवते. शरीरातील रक्त पुरवठा चांगला राहतो.