शेवग्याच्या शेंगा म्हणजे ‘प्रोटीन’, ‘कॅल्शिअम’, ‘व्हिटॅमिन्स’चा खजिना, कधी इंजेक्शन अन् गोळयांची नाही पडणार गरज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   शेवग्याच्या शेंगांचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. परंतु खूप कमी लोकांना याबाबत माहिती आहे. मांस, अंडी आणि दुधापेक्षाही जास्त प्रोटीन यात असतं. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी पोषकतत्वांची खाणच आहे शेवग्याच्या शेंगा. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शियम, फायबर आणि सोडियम आणि वेगवेगळे फिनॉलिक असतात. शेवग्याच्या शेंगाच नव्हे तर पानांचीही भाजी केली जाते. याचे अनेक मोठे आरोग्यदायी फायदे आहेत. याबद्दल माहिती घेऊयात.

1) हाय ब्लड प्रेशर – ज्यांना ही समस्या आहे त्यांनी शेवग्याच्या शेगांचं आवर्जून सेवन करायला हवं. याशिवाय याच्या सेवनानं चक्कर येणं, उलटी होणं, अस्वस्थता अशाही समस्या दूर होतात.

2) कंट्रोल होतं वाढतं वय – यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं. नियमित याचं सेवन केलं तर तुमच्यामध्ये वाढत्या वयाची लक्षणं दिसणार नाहीत. यानं दृष्टीही चांगली राहते.

3) कॅल्शियमचा स्त्रोत – यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यानं हाडं मजबूत होण्यास मदत होते. यामुळं दातही मजबूत राहतात. लहान मुलांना वाढत्या वयात याचा खूप लाभ मिळतो.

4) लठ्ठपणा कमी होतो – शेवग्यात फॉस्फरसचं प्रमाणात जास्त असतं. यामुळं शरीरातील अतिरीक्त कॅलरीज कमी होतात. चरबी कमी होऊन लठ्ठपणा दूर करण्यास याचा खूप फायदा होतो.

5) रक्त शुद्ध होतं – शेवग्याच्या पानांप्रमाणेच शेंगांमध्येही रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते. शेवगा शरीरात अँटीबायोटीक एजंट म्हणून काम करतो. त्वचा विकार कमी करण्याचा याचा खूप लाभ होतो. रक्तातील दूषित घटक वाढल्यानं होणारा अॅक्नेचा त्रासही यामुळं कमी होतो.

6) शुगर नियंत्रणात राहते – याच्या सेवनानं शरीरात रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामुळं डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो. पित्ताशयाचं कार्य सुधारण्यासाठीही याचा खूप लाभ होतो. यामुळं आरोग्य चांगलं राहतं.

7) मोठंमोठे श्वसन विकार कमी होतात – घशात खवखव, कफ असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर 1 कपभर शेवग्याच्या शेंगाचं सूप प्यावं. यामुळं श्वसन मार्गातील टॉक्सिक घटक कमी होतात. क्षयरोग, ब्रोन्कायटीस, अस्थमा अशा आजारात शेवग्याचा मोठा लाभ होतो.

8) संसर्गापासून संरक्षण होतं – शेवग्याच्या पानात आणि फुलात अँटी बॅक्टेरियल घटक असतात. अनेक प्रकारच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी याचा मोठा फायदा होतो. शेंगांमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त असल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. याशिवाय शरीरातील फ्री रॅडीकल्स कमी करण्यासाठीही याचा मोठा फायदा होतो.