‘लिव्हर’साठी ‘वरदान’ ठरते सुकवलेली पपई ! जाणून घ्या 7 आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पपई खाण्यानं आपल्याला खूप लाभ मिळतात. पपई हे एकमेव असं फळ आहे जे कधीही खाल्लं जाऊ शकतं. यात फायबर अँटीऑक्सिडंट आणि बिटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतात. परंतु तुम्हाला कदाचित माहिती नसेल की, सुकवलेली पपई खाल्ल्यानं आपल्याला अनेक फायदे होतात. याने भूक वाढते. शरीर अ‍ॅक्टीव राहतं. जाणून घेऊयात याचे इतर महत्त्वाचे फायदे.

सुकवलेली पपई खाण्याचे फायदे –

1) डोळ्यांचं आरोग्य – पपईत मोठ्या प्रमाणात कॅरोटीनाई़ड असतं. हे डोळ्यांसाठी खूप लाभदायक असतं. सुकवलेल्या पपईत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. डोळ्यांना याचा फायदा होतो.

2) कॅन्सर – सुकवलेल्या पपईच्या सेवनानं तुम्ही कॅन्सरसारख्या आजारापासूनही स्वत:चा बचाव करू शकता.

3) लिव्हरसाठी फायदेशीर – सुकवलेल्या पपईमुळं लिव्हरचं आरोग्य उत्तम राहतं. यामुळं शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात. लिव्हरमधील सेल्सही बॅलन्स होतात परिणामी लिव्हर डॅमेज होत नाही.

4) लिव्हरची सूज – लिव्हरच्या सूज येण्यावर सुकवलेली पपई खाणं हा एक उत्तम उपाय आहे.

5) व्हायरल ताप – सुकवलेली पपई ही अँटी व्हायरल एजंट प्रमाणं काम करते. यामुळं व्हायरल ताप येत नाही. याशिवाय इतर आजारांपासूनही तुमचा बचाव होतो.

6) सांधेदुखीसाठी फायदेशीर – सुकवलेल्या पपईच्या सेवनानं हाडेही मजबूत होतात. सांधेदुखीसाठी याचा मोठा फायदा होतो. यानं पचनक्रियादेखील सुधारते. पपईत असणाऱ्या प्रोटीन, फायबर आणि आयर्नमुळं कमजोरी दूर होते.

7) कोलेस्ट्रॉल कमी करतं – पपईत व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

हेही लक्षात असू द्या

ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी कोणत्याही स्वरूपात पपई खाणं टाळायला हवं. ज्या लोकांना पोटाच्या काही समस्या असतील त्यांनीही पपई खाऊ नये.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.