‘मटार’ खाण्याचे 6 आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  तुम्हाला क्वचितच माहित असेल की, हिवळ्यात मटार खाल्ली तर अनेक आरोग्यदायी फायदे होतात. परंतु याचं सेवनही प्रमाणात असायला हवं नाही तर शरीरात गॅस तयार होतो. याचे काही मोठे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

1) वजन कमी करण्यास फायदा -यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. याचा वजन कमी करण्यास खूप फायदा होता. सकाळी नाष्यात याचं सेवन केलं तर दिवसभर भरपूर एनर्जी मिळते.

2) हाडे मजबूत होतात – यात व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं. अनेक शोधातून ही बाब समोर आली आहे. यामुळं हाडं मजबूत राहतात. हाडांमध्ये होणाऱ्या ऑस्टियोपोसिसचा धोकाही यानं कमी होतो.

3) कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं – यातील घटकांमुळं कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढत नाही आणि तो कंट्रोलमध्ये राहतो. याशिवाय शरीरातील ट्रायग्लिसराईसचा स्तरही वाढत नाही. इतरही अनेक आजारांपासून बचाव होतो.

4) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – यात लोह, झिंक, मॅग्नीज, कॉपर असे पोषक घटक भरपूर असतात. यामुळं विविध आजारांपासून शरीराचा बचाव होतो. यातील अँटी ऑक्सिडंटमुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

5) हृदयरोगांपासून बचाव – हृदयरोगानं ग्रस्त लोकांसाठी मटारचं सेवन फायदेशीर ठरतं. हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

6) केसगळती कमी होते – यातील व्हिटॅमिन सीमुळं केसगळतीला पूर्णविराम मिळतो. केस मुलायम आणि मजबूत होतात. यातील व्हिटॅमिन बी 6, बी 12 आणि फॉलिक अॅसिडमुळं लाल रक्त पेशी तयार होण्यास फायदा होतो. केसांच्या विविध समस्याही दूर होतात.