Health Benefits | दूधासोबत ‘या’ वस्तूंच्या सेवनाने आरोग्याचे होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Health Benefits | प्राचीन काळापासून दुधाचे (Milk) सेवन आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial For Health) मानले गेले आहे. दुधामध्ये शरीरासाठी भरपूर पोषक तत्वे (Nutrients) आढळतात हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. त्याच वेळी, दुधामध्ये आढळणारे कॅल्शियम (Calcium) आपल्या शरीराला निरोगी (Health Benefits) ठेवण्यास मदत करते. आयुर्वेदानुसार दुधात हळद (Turmeric Milk) मिसळून प्यायल्याने अनेक मौसमी आजारांपासून आराम मिळतो.

 

सामान्यत: लोक दुधाच्या सेवनाबद्दल जागरूक नसतात, अगदी खारट पराठ्यासोबत दूध पितात. याशिवाय काही लोक दूध पिल्यानंतर खारट पदार्थ खातात.

 

अनेकदा, आपण दुधासोबत इतर कोणतेही पदार्थ सेवन करतो, त्यामुळे दुधासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करावे याचेही भान ठेवले पाहिजे. दुधासोबत चुकीच्या गोष्टींचे सेवन केल्याने आरोग्याला फायदा (Health Benefits) होण्याऐवजी हानी पोहोचते. दुधाचे सेवन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेवूयात –

 

दुधासोबत काय खाऊ नये (Bad Combination With Milk)?

मीठयुक्त पदार्थ (Salty Foods) :
आयुर्वेदात दूध आणि मीठ हे एकमेकांचे शत्रू मानले गेले आहेत. आयुर्वेदानुसार मीठ (Salt) हे दुधाला विषारी (Toxic) बनवते आणि ते शरीरात विरघळते आणि त्वचारोगांना जन्म देते. त्यामुळे खारट पदार्थ दुधासोबत किंवा रात्री जेवल्यानंतर लगेच खाऊ नयेत. दुसरीकडे, जर तुम्ही मीठ खाल्ले असेल, तर सुमारे 2 तासांनी दुधाचे सेवन करा.

 

उडीद डाळ (Urad Dal) :
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दुधासोबत उडीद डाळ खाणे टाळावे, जर त्यात मीठ किंवा आम्लयुक्त घटक (Acidic Component) मिसळले असतील तर दूध अजिबात पिऊ नये. याशिवाय आंबट पदार्थ (Sour Foods) किंवा आंबट फळे (Sour Fruits) खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये.

मांस आणि दह्यासोबत दूध घेऊ नका (Do Not Eat Meat And Milk Together) :
मासे (Fish) खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करणार्‍यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, कारण यामुळे अन्नातून विषबाधा (Poisoning) होण्याची शक्यता असते. तसेच दही (Curd) खाल्ल्यानंतर दूध पिणे वर्ज्य मानले जाते. आयुर्वेदानुसार, दही खाल्ल्यानंतर लगेच दुधाचे सेवन केल्यास पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. दुधाची पोषकतत्व शरीराला मिळत नाही.

 

रात्री दूध प्यायल्यास काय होते (Drinking Milk Before Bed)?
संशोधनानुसार रात्री एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने चांगली झोप लागते.
वास्तविक, दुधामध्ये असलेले ट्रिप्टोफॅन (Tryptophan) नावाचे अमिनो अ‍ॅसिड (Amino Acid)
स्लीप हार्मोनची पातळी (Sleep Hormone Level) वाढवण्यास मदत करते. हे होर्मोन मन शांत करण्यास आणि झोप घेण्यास मदत करते.

 

याशिवाय यामध्ये असलेले प्रोटीन (Protein), लॅक्टियम (Lactium) हे कॉर्टिसोलची (Cortisol) पातळी कमी
करण्यासोबतच ताण आणि रक्तदाब कमी करून स्नायूंना आराम देण्यास मदत करते.

 

दुधासोबत कोणते फळ खावे (fruits that are compatible with milk)
आयुर्वेदानुसार अनेक फळे दुधासोबत खाण्यास मनाई आहे. जे लोक दूध आणि केळी (Banana) खातात त्यांनी विशेषतः हे खाणे बंद करावे.
केळी दुधासोबत खाल्ल्याने शरीरातील अनेक कार्ये विस्कळीत होतात असे आयुर्वेद सांगतो.

 

याशिवाय, आयुर्वेदानुसार (Ayurveda), केळी आणि दूध घेतल्याने शरीरात जडपणा येतो आणि मेंदूची (Brain) क्रिया मंदावते, जे मुलांसाठी अजिबात चांगले नाही.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Benefits | health benefits consumption of these things with milk can harm health know the reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Panshet Flood | पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्थांना भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्यासाठी 3 वर्षाची मुदतवाढ

 

Virat Kohli | आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात विराट कोहली झाला ‘बोल्ड’; पाहा व्हिडीओ

 

Rain in Maharashtra | राज्यात विकेंडनंतर पुन्हा आस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून Alert