‘संधीवात’ असणाऱ्यांसाठी वरदान ठरतं ‘किवी’ ! जाणून घ्या इतर महत्त्वाचे फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आपल्याला डॉक्टर अनेकदा फळं खाण्याचा सल्ला देतात. परंतु आपण जास्त करून फास्टफूडचंच सेवन करतो. आज किवी या फळाचे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती घेणार आहोत. खास करून संधीवात असणाऱ्यांना याचा जास्त फायदा होतो.

किवी खाण्याचे फायदे पुढील प्रमाणे-
1) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

2) शरीरातील ज्या पेशी कमकुवत आहेत त्यांना सदृढ बनवण्याचं काम किवी करतं.

3) संधीवाताची समस्या कमी होते.

4) आमवात, दमा या रोगांवर किवी हे खूप गुणकारी फळ आहे.

5) मधुमेंहीसाठी फायदेशीर

6) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी याची मदत होते. याचा हृदयाला फायदा होतो.

7) लघवीच्या जागेवर खाज येत असेल किंवा जळजळ होत असेल तर किवी खाल्ल्यानं फायदा मिळतो.

8) जखम लवकर भरून निघते.

9) पचनक्रिया सुधारण्यास फायदा होतो.

कुणी खाऊ नये किवी ?
ज्यांना पित्ताशय किवा मूत्रपिंडाशी संबंधित आजार आहेत त्यांनी किवी हे फळ खाणं टाळावं. काही लोकांना याची अॅलर्जी असू शकते. काहींच्या तोंडाला खाज येते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.