जेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे

पोलिसनामा ऑनलाइन – सर्दी, खोकला, ताप असे सामान्य आजार पावसाळ्यात वेगाने पसरत असतात. शिवाय या काळात अनेकांची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा कमी झालेली असल्याने असे लोक आजारांना लवकर बळी पडतात. कोरोना काळात तर खुपच काळजी घ्यावी लागत आहे. काही विशेष पदार्थांचे सेवन करून तुम्ही शरीराची रोगप्रतिकारकशक्ती आणि उर्जा वाढवू शकतो. यामध्ये जेष्ठमध खुप गुणकारी ठरते. ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसारायजक अ‍ॅसिड, अँटिऑक्सिडंट्स, अँटिबायोटिक तत्व असतात. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. जेष्ठमधाचे कोणकोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

जेष्ठमधाचे फायदे

1 घसादुखी, दम लागणे
घसा दुखणे, सर्दी, खोकला, दम लागणे, तोंड येणे आदी समस्येत ज्येष्ठमध चघळल्यास आराम मिळतो. तसेच ज्येष्ठमधाचा काढा तयार करून प्यायल्यास आराम मिळतो.

2 त्वचारोग
ज्येष्ठमध उगाळून घेऊन त्याचा लेप लावल्याने मुरुमं कमी होतात. याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. मात्र, उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3 ताप
ताप येत असल्यास ज्येष्ठमधाची पावडर, मनुका, मोहाचे फूल, वाळा, त्रिफळा हे सर्व मिक्स करून समप्रमाणात कुटून घ्या. रात्रभर गरम पाण्यात भिजवा आणि सकाळी हे पाणी प्या. आराम मिळतो.

4 अ‍ॅसिडीटी
अ‍ॅसिडीटीची समस्या असल्यास ज्येष्ठमध चूर्णासह मध, आवळा पावडर आणि तूप मिक्स करून मिश्रण बनवा. या मिश्रणाचे सेवन केल्यास अ‍ॅसिडीटीची समस्या कमी होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like