सौंर्दय वाढवण्यासाठी ‘अमृत’ आहे कोरफड ; जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरफड ही वनस्पतीचे बहुगुणी आहे. सौंर्दय वाढवण्यासाठी कोरफड जेल हे त्वचेसाठी अमृतासमान असते. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फोलिक अॅसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांच पुरवठा होतो. त्यामुळे तुम्ही दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश केला पाहिजे.

त्वचेसाठी अमृत कोरफड जेल

  • कोरफड जेल त्वचेला १० मिनिटे लावून थंड पाण्याने धुवा ,चेहरा चमकदार होतो.
  • दरारोज याचा वापर केला तर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
  • कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा उजळते

वजन घटण्यास मदत होते
कोरफडीचा रस प्यायल्याने नैसर्गिकरित्या वजन घटण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामुळे मेटॅबॉलिक रेट वाढून वजन घटते. या रसातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.

कोरफडीचा रस कसा बनवाल ?

– कोरफडीची पात काढून ती स्वच्छ धुवून घ्यावी. पातीचा वरचा हिरवा भाग काढून आतला जेलीसारखा दिसणारा पारदर्शक गर      मिक्सरमध्ये घालून त्याचा रस काढावा.
– रस पिण्याअगोदर गाळून घेतला तरी चालेल. कोरफडीचा कडूपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे मध मिसळावे.
– कोरफडीचा रस काढणे अवघड वाटत असेल तर तुम्ही तो मेडिकल किंवा किराणा दुकानातूनही घेऊ शकता. परंतु कोरफडीचा रस विकत घेण्यापुर्वी तो ऑरगॅनिक असल्याची खात्री करून घ्या. कारण तो आरोग्यदायी असतो.

सर्वसाधारणपणे दररोज ३-४ टेबलस्पून कोरफडीचा रस पिणे आरोग्यदायी असते. परंतु कोरफडीचा कडू रस पिणे अवघड वाटत असेल तर फ्रूट ज्यूसमध्ये किंवा स्मूथीमध्ये मिसळून पिऊ शकता.कोरफडीचा रस आरोग्यदायी असला तरी वैद्यकीय सल्याशिवाय पिऊ नये. कारण त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.