मूळव्याधीवर गुणकारी आहे कोरफड ! जाणून घ्या ‘हे’ 8 औषधी गुणधर्म

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरफड अनेक त्वचाविकार किंवा शारीरिक समस्यांवर गुणकारी आहे. घरातील बागेत आणि कुंडीत कोरफड सहज लावता येते. आज आपण त्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) कोरफडीचा रस हा अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळं त्याचा गर किंवा सुकलेला गर या दोन्हींचाही वापर अनेक रोगांवर केला जातो.

2) जर अपचनाची समस्या असेल तर कोरफडीचा गर, हळद आणि सैंधव मीठ एकत्र करून घेतल्यास त्रास कमी होतो.

3) त्वचेवर भाजल्यास किंवा चटका लागला असेल आणि त्यामुळं व्रण, डाग असतील तर त्यावर कोरफडीचा गर लावावा.

4) हात-पायांची आग होत असेल तर कोरफडीचा गर लावावा. यामुळं शरीराला थंडावा मिळतो.

5) शौचाला साफ होत नसेल तर कोरफडीच्या 5 मिलीलिटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाष्त्यापूर्वी घ्यावा. यामुळं पोट साफ होतं. सोबतच भूकही वाढते.

6) कोरफडीच्या रसात सैंधव मीठ (एक चमचा रस + चिमूटभर मीठ) घालून सकाळी-रात्री पिल्यास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो.

7) नाकातून रक्त येणं, अनेक प्रकारचे त्वचाविकार, पित्त उठणं, रक्ताच्या गाठी, खाज, खरूज, फोड यासाठी मंजिष्ठ, हळद आणि कोरफजीचा उपयोग होतो.

8) डोळे येणं, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साकळणं, भाजलेल्या जागेची आग होणं अशा समस्यांमध्ये कोरफडीचा गर बाहेरून लावल्यानंही खूप उपयोग होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.