Health Benefits of Bitilasana | डझनभर आजारांना दूर ठेवते ‘हे’ एक आसन, जाणून घ्या त्याचे जबदरस्त लाभ आणि ते कसे करावे

नवी दिल्ली : Health Benefits of Bitilasana | नियमित योग केल्यास तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. हे तन आणि मन दोन्हीसाठी लाभदायक आहे. यासाठी आज आम्ही येथे सांगणार आहोत बितिलासनचे फायदे. बितिलासन (Health Benefits of Bitilasana) केल्याने मान मजबूत होते, लोअर बॅक, गुडघे इत्यादीची कमजोरी दूर होते.

 

काय आहे बितिलासन

हे आसन हिंदीत गाय आसन म्हणून ओळखले जाते. इंग्रजीत यास काऊ पॉज (cow pose) म्हणून ओळखले जाते.

 

कसे करतात बितिलासन (How to do Bitilasana)

– प्रथम योगा मॅट जमिनीवर अंथरूण घ्या.

– आता मॅटवर दोन्ही गुडघे वाकवून बसा.

– दोन्ही हात जमिनीवर ठेवा आणि नितंब वर उचला.

– हात आणि मांड्या दोन्ही एकाच उंचीवर असाव्यात.

– गायीप्रमाणे स्थिती करा.

– या दरम्यान दीर्घ आणि खोल श्वास घ्या.

– यानंतर, डोके वरच्या दिशेने उचला.

– जमेल तितका नाभीचा भाक खाली आणा.

– पाठीचा खालचा भाग वरच्या दिशेने असावा.

– लक्षात ठेवा की गुडघ्यांमध्ये काही अंतर असावे.

– या काळात हातही वाकलेले नसावेत.

– आता डोके वरच्या दिशेने उचला आणि कंबर सरळ करा.

– हे सुमारे 10 ते 15 वेळा पुन्हा करा.

 

बितिलासन केल्याने होणारे फायदे (Benefits of doing Bitilasana)

– तणाव आणि निद्रानाशाची समस्या दूर होऊ शकते.

– गुडघे, खांदे आणि नितंबांचे सांधे मजबूत होतात.

– मनगट, हात आणि खांदेही मजबूत होतात.

– मान, खांद्यावरील ताण दूर करण्यासाठी उपयुक्त.

– पाठीच्या कण्यामध्ये लवचिकता येते.

– शरीराची स्थिती सुधारता येते.

– नियमित केल्याने पचनसंस्था निरोगी राहते.

 

बितिलासन करताना ही काळजी घ्या

– सुरुवातीला, हे केवळ तज्ञांच्या देखरेखीखाली करावे.

– मानेच्या समस्या असल्यास करू नका.

– मानेवर जास्त ताण देऊ नका.

– नाभीवर जास्त जोर देऊ नका.

– गुडघ्यांमध्ये थोडे अंतर असावे.

Web Title : Health Benefits of Bitilasana | health benefits of bitilasana cow pose know the method and benefits of doing bitilasan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | ज्येष्ठ नागरिकास गुंगीचे औषध देऊन ‘बिंदीया’ने केले 8 लाखाचे दागिने लंपास, कल्याणीनगरमधील घटना

Petrol Price Today | शुभ वार्ता ! पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा ‘कपात’

Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’