‘कावीळ’, ‘डोकेदुखी’, ‘कफ’ यासह अनेक आजारांवर गुणकारी ठरतं कारलं ! जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अनेकजण जेवणात कारलं आहे असं म्हटलं किंवा कारलं दिसलं तर नाक मुरडतात किंवा कारलं खाणं टाळतात. परंतु इतर हिरव्या भाज्यांप्रमाणे कारलंही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. आज आपण कारल्यांचे आपल्या शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

कारलं खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) रक्त शुद्ध होतं.

2) त्वचाविकार होत नाहीत.

3) दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर कारल्याचा रस आणि तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर त्याचं सेवन करावं. यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हे त्रास दूर होतात. यामुळं इतर आजारांपासूनही तुम्ही दूर राहता.

4) कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो सकाळ संध्याकाळ घेतला तर कावीळ दूर होते.

5) यकृताच्या विकारांमध्ये कारल्याचा रस फायदेशीर ठरतो.

6) पोटात जंत झाल्यास कारल्याचा रस उपयुक्त ठरतो. पोटात कृमी किंवा जंत झाला तर कारल्याचा रस प्यावा.

7) कफाचा त्रास होत असेल तर कारल्याच्या रसाचं सेवन करावं.

8) पोटात गॅस किंवा अपचन झाल्यास कारल्याच्या रसामुळं त्रास कमी होतो.

9) कारल्याच्या रसाचा लेप डोक्यावर लावला तर डोकेदुखी दूर होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.