Coronavirus Treatment : ‘कोरोना’च्या उपचारात कशी गुणकारी आहे दालचिनी ? जाणून घ्या सेवनाचे ‘हे’ 5 फायदे

कोरोना व्हायरसचा धोका सतत वाढत चालला आहे. अजूनही वॅक्सीनचा शोध लागलेला नसल्याने लोकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मात्र, अगोदरपासून असलेली काही औषधे उपयोगी पडत आहेत. याशिवाय काही घरगुती उपायदेखील परिणामकारक ठरत आहेत. संक्रमितांना काढा पिण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, जे संक्रमित नाहीत त्यांनाही काढा लाभदायक ठरू शकतो. या काढ्यात दालचिनीसुद्धा वापरली जात आहे. दालचिनी शरीराची रोग प्रतिकारकशक्ती (इम्यूनिटी) वाढवते. याशिवाय इतरही याचे अनेक फायदे आहेत, ते जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे

1 कोरोना
सर्दी, खोकला, तापासाठी दालचिनी उपयोगी आहे. शिवाय हिच्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आयुष मंत्रालयाने कोरोना काळात जो काढा पिण्याचा सल्ला दिला आहे, त्यामध्ये दालचिनीचीसुद्धा मात्रा आहे.

2 हृदयरोग
दालचिनीच्या सेवनाने शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रा संतुलित राहते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका खुप कमी होतो.

3 कँसर
दालचिनीच्या सेवनामुळे कँसरसारख्या आजाराचा धोका कमी करता येतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशननुसार दालचीनीमध्ये अँटीकँसर गुण आढळतात, जे कँसरचा धोका कमी करतात.

4 डायबिटीज
दालचिनीच्या सेवनाने शरीरात ब्लड शुगरची मात्रा आणि इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यामुळे डायबिटीजचा धोका खुप कमी होतो.

5 बॅक्टेरियल, फंगल इन्फेक्शन
दालचिनीचे सेवन बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनपासून वाचवते, कारण यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण आढळतात.