छोट्याशा लवंगेचे मोठे फायदे, सर्दी-तापापासून दाताचं दुखणं आणि उल्टी थांबण्यासाठी होते मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्याशा लवंगेचे मोठे फायदे आहेत. सर्दी आणि पडशाच्या विकारांमध्ये सुद्धा लवंग उपयोगी पडते. लवंगेचा उपयोग धार्मिक कारणांसाठी आणि भोजनाचा स्वाद वाढवण्यासाठी सुद्धा मसाल्यासारखा केला जातो‌. छोटीशी दिसणारी लवंग आपल्याला आणि प्रकारे फायदा देऊ शकते. अनेकदा चुकीचे अन्न खाल्ल्याने किंवा अन्य कारणांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. मात्र प्रत्येक वेळी औषध घेणे योग्य असत नाही, किंवा वेळीच औषधे मिळत नाहीत. अशी परिस्थिती असेल तर काही त्रास आपण लवंगेचा उपयोग करून कमी करू शकतो.

सर्दी – पडसे झाल्यानंतर एक दोन लवंगा तोंडात ठेवून हलक्या चावाव्यात त्यामुळे सर्दी सोबतच गळ्यातील खवखवी मधून दिलासा मिळेल. कोरड्या खोकल्यामध्ये सुद्धा लवंग उपयोगी असते. दाढेमध्ये दुखणे असल्यास लवंगेच्या तेलामध्ये कापूस बुडवून दातामध्ये कापूस ठेवावा‌. त्याच्यामुळे आपल्याला दाढ दुखण्यापासून सुटका मिळेल. डोकेदुखी होणे सांधेदुखी अशा विकारांमध्ये सुद्धा लवंग तेलाचा मसाज केल्यास दिलासा मिळतो.

लवंगेमुळे पोटातील ऍसिडिटी सुद्धा दूर होते. जर कुठे सहलीसाठी जाणार असाल आणि आपल्याला उलटी होण्याचा किंवा गाडी लागण्याचा त्रास असेल तर लवंग खाल्ल्यास आराम मिळतो. ऑफिसमध्ये बसून काम केल्याने पोटामध्ये कडकपणा अनुभवण्यास येतो. त्यामुळे काही तासांच्या अंतरामध्ये लवंग चावून खावी. बैठ्या कामामुळे लोकांना गॅसची समस्या जाणवते. परंतु त्यासाठी वारंवार औषधे घेणे घातक असू शकते. लवंग तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास आराम मिळतो.