डाळ पचायला जड जाते ? एकदा ‘हे’ उपाय करून पहा

पोलिसनामा ऑनलाईन – अनेकदा गृहिणींची अशी तक्रार असते की, अमूक डाळ नीट शिजत नाही. तर अशा वेळी डाळी नीट शिजाव्यात आणि त्यांचं योग्य पचन व्हावं यासाठी आपण काही सोप्या घरगुती टीप्स जाणून घेणार आहोत. त्यामुळं डाळ कितीही जड असली तरी ती पटकन शिजते आणि ती खाल्ल्यानंतर पचायलाही हलकी जाते.

1) डाळ शिजत आल्यानंतर त्यात थोडंसं आलं किसून घालावं.

2) डाळीला फोडणी देताना कढीपत्ता, मोहरी, जिरे यांच्या सोबत कधीतरी दालचिनीचा तुकडा, काळे मिरे, तमालपत्र घालावं.

3) वरण भात खाताना त्यावर लिंबू पिळावं.

4) शक्यतो डाळीत किंवा वरणात काळ्या मिठाचा वापर करावा.

5) डाळ शिजताना त्यात कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो अशा भाज्या कधीतरी घालाव्यात. अशा भाज्यांची जोड दिली तर डाळ पचायला हलकी जाते.

6) डाळीचे गोड पदार्थ करताना त्यात वेलची, जायफळ आणि सुंठ आवर्जून घालावी.

7) डाळींचे पदार्थ असलेले जेवण केल्यानंतर अननस किंवा पपईच्या दोन फोडी खाल्ल्या तरी पचन सोपं होतं.

8) डाळ शिजवण्यापूर्वी किंचितशी भाजून घ्यावी.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.