‘बडीशेप’चे पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घेतल्यास व्हाल आश्चर्यचकित

पोलीसनामा ऑनलाईन : स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये ठेवलेले मसाले केवळ अन्नाची चवच वाढवत नाहीत तर आरोग्याच्या अनेक समस्यांमध्येही घरगुती उपचार म्हणून काम करतात. अशाच मसाल्यांपैकी एक असणारी म्हणजे बडीशेप. बहुतेक लोक जेवण झाल्यानंतर पचनासाठी बडीशेप खातात. म्हणून बर्‍याच जणांना जेवणानंतर गोड बडीशेप खाण्याची सवय असते. यामुळे गोड अन्नाची तल्लफ संपते आणि दुसरे म्हणजे ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांच्या शरीरात लोह आणि पोटॅशियमची कमतरता असते त्यांना बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो. बडीशेपचे बरेच फायदे आहेत ते जाणून घेऊया.

1. नियमित पीरियड्स येण्यासाठी फायदेशीर : ज्या स्त्रियांना अनियमित पीरियड्सची समस्या उद्भवत असते त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा बडीशेपचे सेवन करावे.

2. बरेच गुणधर्म आहेत : या व्यतिरिक्त बडीशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, लोह, पोटॅशियम सारखे फायदेशीर गुणधर्म आढळतात.

3. पोटाचे आजार दूर होतात : पोट संबंधित सर्व आजार दूर करण्यात बडीशेप प्रभावी आहे. ज्या लोकांना बद्धकोष्ठता होण्याची समस्या असते ते बडीशेप खाऊ शकतात. समस्या दूर होईल.

4. डोळ्यांसाठी फायदेशीर : बडीशेपच्या सेवनामुळे दृष्टी वाढते. दररोज जेवण झाल्यानंतर एक चमचा बडीशेप खावी. त्याशिवाय अर्धा चमचा बडीशेपची पूड एक चमचा साखर कँडीमध्ये मिसळावी आणि रात्री दुधासोबत घ्यावी. दृष्टी वाढण्यास फायदा होईल.

5. अपचन दूर होते : असे आढळून आले आहे की लहान मुलांमध्ये बर्‍याचदा पचनशक्तीची तक्रार असते. यात बडीशेप हा योग्य उपचार आहे. दोन चमचा बडीशेपला दोन कप पाण्यात उकळा. जेव्हा ते एक चतुर्थांश शिल्लक असेल तेव्हा त्यास फिल्टर करा, नंतर थंड करा आणि वापरा. दिवसातून दोन ते तीन वेळा एक-एक चमचा घ्या. मुलांमधील पोटदुखी आणि अपचनच्या तक्रारी दूर होतील.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि सूचना गृहीतकांवर आधारित आहे. पोलीसनामा ऑनलाईन या गोष्टीची पुष्टी करत नाही. यावर अमंलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञाशी जरूर संपर्क साधावा.)