‘या’ लोकांसाठी खुपच गुणकारी गुळाचा चहा, जाणून घ्या कसं ?

पोलीसनामा ऑनलाइन – गुळामध्ये जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. यापासून तयार केलेला चहा पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार टाळण्यास मदत होते. जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूंविरुद्ध लढण्याची शक्ती मिळते. जाणून घ्या त्याचे फायदे…

साहित्य
२ – ४ लोकांसाठी चहा
पाणी – १ कप
दूध – २ कप
गूळ – ३- ४ चमचे (किसलेले)
चहा पावडर – २ चमचे
बडीशेप – १ चमचा
आले पूड – १/२ चमचे
वेलची पूड – १ /२ चमचा
मिरपूड पावडर – १/२ चमचा

तयार करण्याची पद्धत
१) प्रथम एका भांड्यात पाणी, विलायची, बडीशेप, मिरपूड, आले पावडर आणि चहा पावडर घाला.
२) उकळी आल्यावर दूध घालून परत चांगला उकळून द्या.
३) १ – २ उकळी आल्यानंतर त्यात गूळ मिसळा.
४) गूळ मिसळल्यानंतर गॅस बंद करावा आणि चहा गाळून घ्या.

टीप – गूळ घालून चहा जास्त काळ उकळू नये. नाही तर चहा फुटू शकतो.

गुळाच्या चहाचे फायदे
१) मायग्रेनपासून आराम
अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल गुणधर्म असलेला गूळ याचा चहा घेतल्यास मायग्रेनच्या वेदना किंवा सामान्य डोकेदुखीपासून आराम मिळतो. गाईच्या दुधापासून व गुळापासून तयार केलेला चहा घेतल्यास काही मिनिटांत दुखण्यापासून आराम मिळतो.

२) वजन नियंत्रणाता राहील
गुळाला एक नैसर्गिक साखर मानली जाते. अशा परिस्थितीत त्याचे सेवन केल्याने निरोगी राहते. तसेच वजन वाढण्याची समस्यादेखील टाळता येऊ शकते. हिवाळ्यात लोकांना वारंवार चहा पिणे आवडते. अशा परिस्थितीत साखरेऐवजी गूळ वापरणे अधिक चांगले आहे.

३) उत्तम पाचनतंत्र
गुळाचा चहा पिल्याने पाचनतंत्र अधिक चांगले कार्य करते. चहा तयार करण्यासाठी कृत्रिम स्वीटनरचा अगदी थोड्या प्रमाणात वापर केला जातो. त्यातून तयार केलेला चहा घेतल्यास पोटाच्या समस्येचा धोका कमी होतो.

४) प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
गुळाच्या चहाला ऊर्जा बूस्टर फूड लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. यापासून तयार केलेल्या चहाचे सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच आजारांशी लढण्याचे सामर्थ्य देते. दिवसभर शरीर ताजे राहते.

५) रक्त वाढवण्यासाठी
लोहयुक्त गुळाचे सेवन केल्याने रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होते. अशक्तपणा असलेल्या रुग्णांना गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते आणि थकवा व अशक्तपणा दूर होतो. तसेच, शरीराच्या सर्व अवयवांमध्ये ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचतो.

जास्त प्रमाणात गूळ खाणे टाळा
जरी गूळ पोषक द्रव्यांनी परिपूर्ण असेल. तरीही त्याचा उबदारपणामुळे ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे; अन्यथा आरोग्यास हानी पोहाेचू शकते.
जास्त गूळ सेवन केल्याने पाचनतंत्र कमकुवत होऊ शकते.
नाकातून रक्तदेखील होऊ शकतो.
वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.