सतत डोकेदुखीमुळं त्रस्त आहात ? करा सुंठ पावडरचं सेवन, मिळतील ‘हे’ 9 मोठे फायदे ! जाणून घ्या तयार करण्याची पद्धत

पोलिसनामा ऑनलाइन – सुंठ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात अनेकजण सुंठ घातलेला चहा पिणं पसंत करतात. यामुळं सर्दी-खोकल्या सारखे किरकोळ आजार तर दूर होतातच. याशिवाय याचे इतरही अनेक फायदे आहेत. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. इतकंच नाही तर सुंठ पावडर घरीच कशी तयार करायची हेही आपण जाणून घेणार आहोत.

सुंठ पावडरचं सेवन करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) पचनक्रिया सुधारते.

2) अपचन, बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणं या समस्या दूर होतात.

3) खोकला, सर्दी, ताप या तक्रारींमध्ये गुणकारी

4) डोकं दुखत असेल तर सुंठ पावडरचा लेप डोक्याला लावावा. यामुळं फायदा मिळेल.

5) यामुळं मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होतो.

6) वजन नियंत्रणात रहातं.

7) शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते.

8) रक्तातील साखर नियंत्रणात रहाते.

9) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

कशी तयार कराल सुंठ पावडर ?

यासाठी पुढीलप्रमाणे कृती करावी –

1) आलं उन्हात कडक वाळवून घ्या.
2) आता हे वाळलेलं आलं मिक्सर मध्ये घाला आणि बारीक पूड तयार करून घ्या.
3) आता ही पूड गाळणीच्या सहाय्यानं चाळून घ्या.
4) आता तुमची घरीच बनवलेली सुंठ पावडर तयार आहे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.