बद्धकोष्ठता रुग्णांसाठी पेरू वरदान, जाणून घ्या 8 फायदे

पेरू(guava) मध्ये जीवनसत्त्वे, लोह, फायबर, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. रोज पेरू (guava) खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. अनेक रोगांपासून संरक्षण होते. पचन प्रणाली मजबूत होते. आणि पोटाच्या समस्येचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. चला तर मग जाणून घेऊया पेरू खाल्याचे मोठे फायदे..

१) सर्दी- थंडी
सर्दी व थंडीने त्रस्त असलेल्या लोकांनी आपल्या आहारात पेरुचा समावेश करणे आवश्यक आहे. त्याचं सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. नेहमीचं होणाऱ्या सर्दीच्या समस्येपासून मुक्तता मिळते.

२) वजन नियंत्रण
पेरू सेवन केल्यानं शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी राहते. व वजन कमी करण्यास मदत करते.

३) तोंडात फोड येणे
बर्‍याचदा लोकांना तोंडाच्या फोडांचा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी पेरूची कच्ची पाने चघळल्यास फायदा होतो. तोंडाच्या अल्सरचा त्रास कमी होतो.

४) बद्धकोष्ठता पासून आराम
बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त लोकांनी दररोज पेरूचे सेवन करावे. पेरू खाल्ल्याने पोट स्वच्छ होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

५) डोळ्यांसाठी फायदेशीर
पेरूमध्ये भरपूर व्हिटॅमिन ए असतात. पेरू खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते आणि दृष्टी वाढण्यास मदत होते.

६) मधुमेह नियंत्रित राहते
मधुमेह असलेल्या रुग्णांनी पेरूचे सेवन करणे फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित राहते.

७) कर्करोग
नियमितपणे पेरू खाल्ल्याने शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते. कर्करोगाचा धोका अनेक पटींनी कमी होतो.

८) त्वचेची समस्या दूर होते
पेरूमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मुरूम, डाग आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्तता होते. चेहरा खूप स्वच्छ आणि चमकदार दिसतो.