जाणून घ्या आरोग्यदायी मधाचे ‘हे’ 10 गुणकारी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन – मध अत्यंत गुणकारी आहे. भूक वाढवण्यापासून तर पचनशक्ती वाढव्यापर्यंत याचे अनेक फायदे होतात. याचे शरीराला आणि केसालाही अनेक फायदे होतात. हे फायदे कोणते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1) मधाच्या सेवनामुळं तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

2) याचा फायदा तमची पचनशक्ती वाढवण्यासाठी होतो. यासाठी तुम्ही रोज मधाचं सेवन करू शकता.

3) जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर यामुळं तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

4) मधाचं सेवन केलं तर यामुळं तुमचं रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

5) जर तुम्हाला डोळ्यांशी निगडीत काही समस्या असतील तर गाजराचा रस आणि मध एकत्र करून त्याचं सेवन करावं. यामुळं फायदा मिळेल.

6) अनेकांना भूक न लागण्याची समस्या असते. त्यांनी जर मधाचं सेवन केलं तर भूक वाढण्यास मदत होते.

7) पोटदुखी, मळमळ होत असेल तर आल्याच्या रसात किंवा लिंबाच्या रसात मध घालून ते खाल्ल्यास पोटदुखी कमी होते.

8) हिवाळ्यात अनेकदा सर्दी, खोकला, पडसं अशा समस्या येतात. अशात जर तुम्ही कोमट पाण्यात 2 चमचे मध घालून ते पाणी पिलं तर यामुळं आराम मिळतो.

9) खरूज किंवा त्वचेसंबंधित तक्रारी आल्या तर एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घालून ते पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावं.

10) केसांच्या वाढीसाठीही मधाचा खूप फायदा होतो.