लठ्ठपणापासून तर अँटी एजिंगपर्यंत अनेक गोष्टींवर रामबाण उपाय आहे मसूर डाळ ! जाणून घ्या इतर आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपण आहारात विविध डाळींचं सेवन करत असतो. आज आपण मसूर डाळीचे फायदे जाणून घेणार आहोत. एक कप मसूर डाळीत 230 कॅलरीज, 15 ग्रॅम डाएट्री फायबर आणि 17 ग्रॅम प्रोटीन असतं. आयर्न आणि प्रोटीननं परिपूर्ण असल्यानं शाकाहारी लोकांची ही विशेष आवड आहे. ही डाळ आपल्या आरोग्यासोबतच त्वचा, हाडं आणि केस यासाठीही फायदेशीर असते. आज आपण याचे विविध लाभ जाणून घेणार आहोत. इतकंच नाही तर याचं अतिसेवन केलं तर याचे काही दुष्परिणाम देखील होतात. त्याचीही माहिती आपण घेणार आहोत.

1) ब्लड शुगर कंट्रोल – मसूर डाळीत मोठ्या प्रमाणात डाएट्री फायबर असतात. ही ग्लायसेमिक इंडेक्सच्या खालच्या पायरीवर येते. जे लहान आतड्यात रक्त कोरडे होण्यापासून प्रतिबंध करते. डायजेशन रेट कमी करते आणि ब्लड शुगरच्या पातळीला अचानक किंवा अवांछित बदलांपासून वाचवते. ज्या लोकांना शुगर, डायबेटीज आणि इंसुलिन उत्पादन मध्ये कमतरतेची समस्या असते त्यांन ही डाळ रोज खावी.

2) लठ्ठपणा – वजन कमी करणाऱ्या पदार्थांमध्ये मसूर डाळ एक उत्तम स्त्रोत मानली जाते. यात मन तृप्त करणाऱ्या कार्बोहायड्रेटचं योग्य प्रमाण असतं, सोबत यामुळं शरीरातील चरबीही कमी होते. यातील हाय फायबरची मात्रा डायजेशनची प्रक्रिया मंद करते जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतं. रोज एक वाटी मसूर डाळ आहारात असेल तर त्यामुळं प्रोटीन, व्हिटॅमिन आणि इतर पोषक तत्वांची पूर्तता सहज होते.

3) अँटी एजिंगचा खजिना – मसूर डाळ अँटी ऑक्सिडंटचं पावर हाऊस आहे. जे पेशींना नुकसान पोहोचवण्यापासून वाचवतात. यातील पोषक तत्वांचं प्रमाण आपली इम्युन सिस्टीम मजबूत करतं. ज्यामुळं हे अँटी एजिंग फूड मानलं जातं. ही डाळ आपले रंग, रूप उजळ बनवण्यास मदत करते. या डाळीचा वापर आहाराव्यतिरीक्त स्किन संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील केला जातो.

4) हाडं, दात आणि हृदय – मसूरची डाळ ही व्हिटॅमिन आणि इतर पोषक तत्व जसं की, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा एक समृद्ध स्त्रोत आहे. जे दात आणि हाडांचं आरोग्य स्वस्थ ठेवतात. यासाठी ही डाळ रोज आपल्या डाएटमध्ये असावी. यात डाएट्री फायबरची मात्रा अधिक असल्यानं मसूर डाळ शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यास मदत करते. शरीरातील अतिरीक्त कोलेस्ट्रॉलपासून सुटका मिळवण्यासाठी ही डाळ खूप लाभदायक ठरते. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करून रक्त वाढवतं आणि हार्ट फेल्यूअरचा धोकाही कमी होतो.

5) तजेलदार आणि चमकती त्वचा – जर तुम्हाला सुरक्षित, तजेलदार, सुंदर, मुलायम, चमकदार, डागरहित त्वचा हवी असेल तर मसूर डाळ हा एक उत्तम पर्याय आहे. ही डाळ त्वचेवरील काळे डाग, सुरकुत्या दूर करण्यास मदत करते. तसंच ही डाळ टॅनिंगपासूनही मुक्ती मिळवून देते. यासाठी वाटलेली मसूर डाळ, हळद आणि गुलाबजल मिक्स केलेला फेसपॅक चेहऱ्याला लावावा. कोरडेपणा दरू करायचा असेल तर या मिश्रणात दूध मिक्स करा आणि हे फेस पॅक रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा.

6) 44 टक्के प्रोटीन – 100 ग्रॅम मसूर डाळीच्या सेवनानं आपल्याला 352 कॅलरीज आणि 24.63 ग्रॅम किंवा 44 टक्के प्रोटीनची मात्र प्राप्त होते. त्यामुळं याचा व्यायाम करणाऱ्या मंडळींनाही चांगला फायदा होतो.

मसूर डाळीच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम –
1) किडनीचे आजार
2) पोटॅशियम गॅसची विषाक्तता
3) हाय ॲमिनो ॲसिड निर्माण होणं
4) काही लोकांना याची ॲलर्जीही होऊ शकते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.