पपईच्या सेवनानं ‘या’ मोठ्या शारीरिक समस्या होतील दूर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकांच्या बागेत आपल्याला पपईचं झाड पहायला मिळतं. कारण पपईचं झाड कोणत्याही जागेत लगेच रुजतं. शिवाय कमी कालावधीत बहरून देखील येतं. पपईची आणखी एक खासियत म्हणजे पपई कोणत्याही ऋतूत सहज उपलब्ध होते.

अनेकजण पपई आवडीनं खातात, काहींना मात्र पपई आवडत नाही. परंतु याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) दातदुखीवर पपई खूप गुणकारी आहे. जर दात दुखत असेल तर कापसाचा बोळा पपईच्या चिकात बुडवून जो बोळा दातावर ठेवावा. यामुळं आराम मिळेल.

2) तोंडाचा अलसर असेल तर त्यावरही याचा फायदा होतो.

3) घसा खवखवणं आणि सूज येणं अशा समस्यांवरही पपई गुणकारी आहे.

4) अर्धांगवायूत पपई खूप फायदेशीर ठरते.

5) अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

6) त्वचेसंबंधित तक्रारी दूर होतात.

7) पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.