दररोज भाजलेले फुटाणे खा, तुम्हाला होतील ‘हे’ 7 मोठे फायदे, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – हिवाळ्यात लोक भाजलेले शेंगदाणे आणि मका खाण्याचा आनंद घेतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? याशिवाय भाजलेले फुटाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मधुमेह रुग्णांना फुटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. कमी चरबी असण्याबरोबरच, त्याचे सेवन वजन नियंत्रणासह ऊर्जा पातळी वाढविण्यात मदत करते. जाणून घेऊया हे खाण्याच्या फायद्यांबद्दल …

१) मधुमेहासाठी फायदेशीर
त्यात फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरी कमी असते. अशा वेळी भाजलेले फुटाणे शरीरात ग्लूकोजची मात्रा शोषून घेऊन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास फायदेशीर ठरते. म्हणूनच मधुमेह रुग्णांनी आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे.

२) रक्तदाब नियंत्रण करते
फुटाणे रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते. हे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. यामुळे रक्तदाब नियंत्रणाखाली राहून हृदयाची समस्या दूर होतो.

३) ऊर्जा मिळते
भाजलेले फुटण्यात प्रथिने, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे, फायबर इ. पौष्टिक घटक असतात. दररोज २ मुठभर भाजलेले फुटाणे खाल्ल्याने सुस्ती दूर होते आणि ऊर्जेची वाढ होते. थकवा आणि अशक्तपणापासून आराम मिळतो. दिवसभर ऊर्जावान वाटते. तसेच यामुळे शरीरात उष्णता वाढते.

४) रक्त वाढते
त्यात लोह असल्याने रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. अशक्तपणाच्या रुग्णांनी आपल्या आहारात याचा समावेश केला पाहिजे.

५) वजन कमी करते
भाजलेल्या फुटाण्यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. ते खाल्ल्याने शरीराला फक्त ४६-५० कॅलरीज मिळतात. तसेच, त्याचे सेवन केल्याने पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते. यामुळे जास्त खाणे टाळले जाते. आपण स्नॅक म्हणून देखील खाऊ शकता.

६) बद्धकोष्ठता दूर करते
चुकीच्या आहारामुळे आजकाल लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावत आहे. अशा वेळी भाजलेल्या फुटाण्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. हे पचन समस्या कमी करते आणि पचन प्रणाली सुधारते. तसेच पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो.

७) पाठदुखीचा त्रास
हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण भाजलेले फुटाणे खाल्ल्याने पाठदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. त्यामध्ये प्रथिनेचे योग्य प्रमाणात असते त्यामुळे हे सेवन केल्याने पाठदुखीपासून मुक्तता आणि अशक्तपणाची समस्या कमी होण्यास मदत होते.