कवठ खाल्ल्यानं होतात ‘हे’ 6 मोठे फायदे ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कवठ फळ सर्वांनाच माहित आहे. चटणीसाठी, सरबतासाठी, मुरांबा, जॅमसाठी याचा वापर जास्त केला जातो. अनेकांना याच्या गऱ्यात गूळ घालून तो पोळी सोबत खायला आवडतो. कवठ खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात जे खूप कमी लोकांना माहित आहे. आज याच बद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) भूक लागत नसेल किंवा कमी झाली असेल तर कवठ खावं.

2) मळमळ, उलटी असा त्रास होत असेल तर कवठ खावं. यामुळं त्रास कमी होतो.

3) जुलाब होत असेल तर कवठाचं सेवन करावं.

4) अंगावर पित्त उठलं असेल तर कवठाच्या पनांचा रस अंगाला लावल्यास फायदा मिळतो.

5) कवठाची पानं सुवासिक व वातशामक असतात.

6) कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार आदी विकारांवर उपयुक्त आहे.

‘ही’ सावधानता बाळगा

– कवठ पिकलेलंच खावं, कच्च खाल्लं तर सर्दी, खोकला, डोकेदुखी असे त्रास होऊ शकतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.