जाणून घ्या नाचणीचे ‘हे’ 13 आरोग्यदायी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तुम्ही नाचणीची भाकरी खाल्लीच असेल. आजारी माणसासाठी नाचणी चांगली असते हेही सर्वांना माहित आहे. पिष्टमय पदार्थ किंवा स्टार्च असणाऱ्या पदार्थात भात, वऱ्याचे तांदूळ या वर्गात नाचणीचा शेवटचा क्रमांक आहे.

1) नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची पेज उत्तम आहार आहे.

2) अजीर्ण होणं, पोटात गॅस धरणं, पोटदुखी, आमांश, अपचन या तक्रारी नाचणी खाल्ल्यानं दूर होतात.

3) नाचणीमुळं वजन नियंत्रणात राहतं.

4) चणे, हरभरा, उडीद, पोहे, शेंगदाणे, बटाटा हे पदार्थ शरीर बृंहण करण्याचं कार्य करतात. ते काम नाचणी करणार नाही. नाचणी पोटाला त्रास न देता जीवन रक्षणापुरतेच पिष्टमय पदार्थ शरीराला पुरवते.

5) नाचणीचा विशेष उपयोग आमांश, अजीर्ण, उदरवात, जुनाट ताप या पुन्हा पुन्हा त्रास देणाऱ्या रोगात होतो.

6) नाचणीला कधी कीड लागत नाही. त्यामुळं ती वर्षभर आरामात साठवून ठेवता येऊ शकते.

7) अनेकवेळा डॉक्टर लहान मुलांना नाचणी सत्व देण्यास सांगतात.

8) नाचणी पित्तनाशक, थंड, तृप्तीकारक व रक्तातील तीक्ष्ण, उष्ण दोष कमी करते.

9) कंबर खूप दुखत असेल तर नाचणीची पेज घ्यावी.

10) नाचणीमुळं शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते.

11) गोवर आणि कांजण्या तसंच नागीण विकारात पथ्यकर म्हणून नाचणीच्या पिठाची भाकरी खावी. लवकर ताकद भरून येते.

12) फोड फोडण्यासाठी नाचणीच्या पिठाचे पोटीस बांधावे.

13) जर केस गळत असतील तर नाचणीच्या तुसाच्या राखेचा उपयोग करावा. या राखेनं केस धुवावेत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.