जाणून घ्या दही-गुळाचे फायदे, रक्त वाढवण्यासह आजारपण राहील खूपच दूर

पोलिसनामा ऑनलाईन – शरीराला निरोगी व आजारांपासून वाचवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पौष्टिक गोष्टी खाल्ल्यामुळे विशेषत: तरुण वयात, आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतात. अशा परिस्थितीत बरेच लोक अनेक गोष्टीचे सेवन करतात. परंतु, आपल्या रोजच्या आहारात फक्त २ गोष्टींचे सेवन केल्यास आरोग्यास अनेक फायदेही मिळू शकतात. त्या गोष्टींविषयी जाणून घेऊ या …

त्या दोन गोष्टी दही आणि गूळ आहेत . लोकांना दहीमध्ये साखर टाकून खायला आवडते. परंतु, त्यात गूळ मिसळून खाल्ल्याने पचन तंत्र मजबूत होते आणि वजन कमी होते.

१) श्वासोच्छवासाशी संबंधित अडचणी दूर होतील
दहीमध्ये गूळ मिसळून खाल्ल्यास शरीराचे तापमान चांगले होते. तसेच, श्वासोच्छवासाशी संबंधित समस्येवर मात केली जाते.

२) मासिक पाळीत फायदेशीर
मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना बर्‍याचदा असह्य वेदना होत असतात. अशा वेळी गूळ टाकून दही खाणे फायदेशीर आहे. ते खाल्ल्याने पोटदुखी, पित्त इत्यादीपासून आराम मिळतो.

३) रक्त वाढते
अशक्तपणाची तक्रार करणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात गूळ आणि दहीचा समावेश करावा. त्यात लोह असल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यात मदत करते.

४) वजन कमी करते
वजन वाढल्यामुळे शरीर अनेक आजारांना बळी पडण्यास सुरुवात होते. अशावेळी गूळ आणि दही खाणे फायद्याचे आहे. हे ओटीपोटात आणि कंबरभोवती झालेली अतिरिक्त चरबी कमी करून मेटाबॉलिज्म वाढविण्यास मदत करते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

५) हंगामी आजारापासून बचाव होतो
हिवाळ्यात हंगामी आजाराचा धोका जास्त असतो. यासाठी गूळ आणि दही खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवून सर्दी, खोकला इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

६) हाडे मजबूत होतात
दहीमध्ये असलेले कॅल्शियम स्नायू, दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते. तसेच, शरीराच्या चांगल्या विकासासह अनेक आजाराचा प्रतिबंध करते.

७) उत्तम पचन प्रणाली
गूळ व दहीचे सेवन पचन तंत्राला बळकट करण्यात मदत करते. गूळ व दही पोटदुखी, पित्त बद्धकोष्ठता, अपचन इ. प्रतिबंधित करते.