अक्षय कुमार-ट्विंकल अन् खिचडी ! डिंपलची पहिली भेट संस्मरणीय, जाणून घ्या ‘खिचडी’ खाण्याचे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – पचनक्रिया ठिक ठेवण्यासाठी खिचडी तितकीच प्रसिद्ध आहे. जितकी डिंपल कपाडियासोबत अक्षय कुमारची बॉन्डिंग आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान डिंपल कपाडियाने अक्षय-ट्विंकल आणि खिचडी यांच्यातील एक किस्सा सांगितला आहे. अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नानंतर जेव्हा ती पहिल्यांदा अक्षय आणि ट्विंकल यांना भेटली तेव्हा खिचडीशी संबंधित एक मजेदार गोष्ट घडली.

जेव्हा आई लग्नानंतर प्रथमच आपल्या मुलीच्या घरी जाते तेव्हा आई खिचडी घेऊन नाही जात किंवा मुलगी व जावई त्यांना खिचडी देत नाहीत ! कारण त्यांचे त्यांच्या घरी प्रथमच स्वागत करणे नेहमीच विशेष असते. पण त्या दिवसाची खिचडी डिंपलसाठी संस्मरणीय ठरली. कारण त्या काळात अक्षय कुमारचे पोट खराब होते आणि ट्विंकल त्यांच्यावर सतत विनोद करत होती. इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, अभिनेता असो की सामान्य माणूस, जेव्हा पोटाला बरे करण्याचा विचार येतो तेव्हा प्रत्येकाला खिचडीवर अवलंबून राहावे लागते …

पोटाच्या कोणत्या समस्यामध्ये खिचडी खाल्ली जाते ?
– खिचडी खाण्याची काही वेळ नसते. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकतो. परंतु जेव्हा आपले पोट व्यवस्थित नसेल अपचन, जुलाब, पित्त किंवा गॅसची समस्या आपल्याला सतत त्रास देत असते. तेव्हा मग तुम्ही खास करून खिचडी खावी.
– खिचडी बनवण्यासाठी तांदूळ आणि मुग डाळ वापरली जाते. याशिवाय तुम्ही हिरव्या कोथिंबिरीची पाने, हंगामी भाज्या इत्यादी एकत्र करुनही बनवू शकता.
– जुलाब होत असेल तर खिचडी फक्त तांदूळ आणि हिरवी मूग डाळ यापासूनच तयार केली जाते. ते बनवताना पाण्याचे प्रमाण पुलावापेक्षा किंचित जास्त ठेवले जाते. जेणेकरून ते थोडे पातळ होईल. जुलाब झाल्यावर पाचक प्रणाली खूपच कमकुवत होते आणि अशा परिस्थितीत अन्न पचवणे फार अवघड असते.

खिचडीमुळे आराम कसा मिळवू शकेल ?
– आपल्याला माहित आहे की भात आणि डाळीचा उपयोग करून खिचडी बनवली जाते. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट आणि पाणी असते.
– कार्बोहायड्रेट्स शरीराला आतून बळकट करण्यासाठी मदत करतात. फायबर हळूहळू पचते. जेणेकरून ते आपल्या शरीरास बर्‍याच काळासाठी ऊर्जा देते. पाणी शरीरात डिहाइड्रेशन होऊ देत नाही. कारण जुलाब झाल्यावर शरीरात पाण्याची कमतरता असणे सामान्य आहे.
– म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला काही हलके खाण्याचा मूड असेल किंवा पोटाची काही समस्या असेल तर तुम्ही खिचडी खाऊ शकता.

You might also like