मशरूम खाल्याने मधुमेह, हृदयाचे रोग यांसारखे अनेक आजार दूर पळतात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मशरूमला जगभर एक ‘पौष्टिक अन्न’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. मशरूम संपूर्णतः शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरूम वरील संशोधनानंतर मशरूम मध्ये ‘ॲन्टी व्हायरल’ व ‘ॲन्टी कॅन्सर’चे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत. आपल्या शरीराच्या वाढीसाठी व सुस्थितीत राहण्याकरिता १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहा अमिनो आम्ले मशरूम मध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. तसेच मशरूम अनेक आजारांवर गुणकारी आहे.

मशरूम खाण्याचे फायदे –

वजन कमी करण्यास उपयुक्त-

हाय प्रोटिन आणि लो कार्ब डाएटसोबत जर तुम्ही तुमच्या आहारात मशरूमचा समावेश केला तर तुमचं वजन झपाट्यानं कमी होण्याची शक्यता वाढते.मशरूममधील ५० टक्के घटक तंतूमय कर्बोदकं (fibrous carbohydrates) असतात. ज्यामुळे तुमच्या आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया तयार होतात आणि पचनक्रिया सुरळीत राहते परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

हाडं मजबूत होतात

मशरूम हा कॅल्शिअमचा स्रोत आहे, जो हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असतो. शरीराला आवश्यक तितकं कॅल्शिअम मिळाल्यास सांधेदुखी होत नाही, सांध्यांमधील वेदना दूर होतात. त्यामुळे हाडांसंबंधी आजार दूर ठेवण्यासाठी नेहमी ताजे मशरूम शिजवून खावेत.

हृदयाच्या रोगापासून संरक्षण –

मशरूममधील प्रोटिनमुळे कोलेस्ट्रॉल बर्न होतं. जेव्हा मशरूम पचतात तेव्हा त्यातून एक एन्झाइम तयार होते आणि त्यामुळे शरीरातील चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. स्ट्रोक, हार्ट अटॅक अशा कोलेस्ट्रॉलमुळे बळावणाऱ्या हृदयाच्या आजारांपासूनही मशरूम संरक्षण देतं.

मधुमेहावर गुणकारी –

शरीरात योग्यप्रकारे इन्सुलिन तयार होत नसल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह होतो. इन्सुलिन हार्मोन योग्य प्रमाणात असल्यास यकृत, स्वादुपिंड आणि अंत:स्रावी ग्रंथींचं endocrine glands कार्य सुरळीत चालतं. मशरूममध्ये असे घटक असततात जे इन्सुलिनच्या निर्मितीस मदत करतात.

रक्तदाब कमी होण्यास मदत –

काही मशरूम हे पोटॅशिअमयुक्त असतात ज्यामुळे मिठा शरीरावरील नकारात्मक परिणाम कमी होतो. रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते –

मशरूममध्ये एर्गोथायोनिन Ergothioneine हा ॲन्टी ऑक्सिडंट असतो जो फ्री रेडिकल्सपासून संरक्षण देतो. तर त्यातील नैसर्गिक अँटिबायोटिक्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारतं. मशरूममधील दोन्ही घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

न्यूट्रिएंट्सचं शोषण होतं –

मशरूममध्ये व्हिटॅमिन डी हा घटक असतो, ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या न्यूट्रिएंट्सचं योग्य शोषण होतं. व्हिटॅमिन डीमुळे फॉस्फरस आणि कॅल्शिअम यांची चयापचय प्रक्रिया वाढते आणि शरीर जलद गतीनं पोषक घटक शोषून घेतं.