केसापासून ते नखापर्यंत शरीरातील अनेक समस्यांवर ‘कांदा’ गुणकारी

पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात कांदा असतोच. कांदा घरा पुरताच मर्यादित नाही. कॉस्मेटोलॉजी आणि औषधांमध्ये देखील कांद्याचा वापर केला जातो. जेवणात वापरण्यात येणारा कांदा शरीरासाठी गुणकारी उपाय ठरतो. कांद्यामुळे शरीरातील अनेक व्याधी बऱ्या होतात. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, खनिज, कॅलरी, लोह, फॉस्फरस असते. त्याशिवाय कांदा आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढतो. कांद्याचे नेहमी सेवन केल्याने अनेक समस्यांचा त्रास कमी होतो. जाणून घेऊयात कांद्याचे फायदे… (health benefits of Onion)

बुद्धकोष्टता कमी करण्यात मदत
काद्यामध्ये असलेले फायबर पोटासाठी खूप फायदेशीर असते. कांदा खाल्याने कफ दूर होतो. जर तुम्हाला वारंवार बुद्धकोष्टता होत असेल तर यावर रामबाण उपाय म्हणजे जेवणामध्ये नियमित कांदा खाणे. यामुळे बुद्धकोष्टता कमी होण्यास मदत होते.

घशाची खवखव कमी होते
ज्या लोकांना वारंवार सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. अशा लोकांनी कांद्याचा सर प्यावा. या रसात गूळ किंवा मध मिसळू पिल्याने याचा चांगला फायदा होतो. हे मिश्रण आपल्या शरीरासाठी गुणकारी ठरते.

नाकातील रक्तस्त्राव थांबवतो
नाकातून रक्तस्त्राव होत असेल तर, कच्चा कांदा कापून त्याचा वास घ्यावा. यामुळे नाकातून होणारा रक्तस्त्राव थांबतो आणि आराम मिळतो.

मधुमेहावर गुणकारी
मधूमेह असलेल्या लोकांनी नियमित कांदा खाल्ला तर शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार होते. मधूमेह असणाऱ्या लोकांनी जेवणात सलाडच्या रुपात कांदा खाल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. मधुमेहावर कांदा गुणकारी आहे.

हृदयाचे आजार कमी होतात
कच्चा कांदा रक्तदाब नियंत्रित करतो. कांद्यात मिथाईल सल्फाइड आणि अमिनोएॅसिड असते. त्यामुळे कोलेस्टरॉल नियंत्रणात राहतो आणि हृदयासंबंधित समस्या दूर होतात.

केस गळणे थांबते
केसगळतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कांदा खूपच फायदेशीर आहे. केसांवर कांद्याच्या रसाने मालिश केल्यास केस गळणे थांबते. तसेच कांद्याचा लेप लावल्याने कमी वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात.

फिट्सच्या समस्येवर गुणकारी
जर हायस्टीरियाचा (फिट) रोगी बेशुद्ध झाला असेल तर कांदा कुटुन नाकाला लावला तो लगेच शुद्धीवर येतो.

पचनक्रिया सुधारण्यास मदत
हिरवा कांदा खाण्याचे खूप फायदे आहेत. हिरव्या कांद्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असल्याने हा कांदा खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. हिरव्या कांद्यामध्ये क्रोमियम देखील असते.

दृष्टी सुधारते
कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात असल्याने कांद्याचे सेवन नियमित केल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते.

मुतखड्यावर गुणकारी
कांद्याच्या रसात साखर मिक्स करुन रिकाम्या पोटी पिल्यास किडनी स्टोन (मुतखडा) बाहेर पडण्यास मदत होते.

केसतोडीची वेदना कमी होते.
अनेकवेळा शरीरावरील केस तुटल्याने त्या ठिकाणी फोड येतात आणि वेदना होतात. कांदा भाजून त्यावर बांधल्यास केस तोडीच्या वेदनेपासून सुटका मिळू शकते. तसेच फोड येणे देखील बंद होते.

खास टीप – कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

You might also like