डोळयांच्या समस्येपासून ते ह्दयरोगासाठी ‘पपई’ बहुगुणकारी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पपई हे सर्वत्र आणि अगदी सहजपणे उलपब्ध असणारे फळ आहे. आजारपणात सुद्धा पपई फायदेशीर असते. त्याचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत. पपई मध्ये खनिज, पोषक तत्वे आणि व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात. कच्च्या पपईचा वापर भाजी बनवण्यासाठी करतात तर यापासून सलाडदेखील बनवला जातो. तसेच पपईच्या बियांचे खूप औषधी गुण आहेत. ज्यामुळे आपला अनेक रोगांपासून बचाव होतो.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये पपईचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. पपईचा वापर अनेक प्रकारचे औषध बनवण्यासाठी केला जातो. विशेष करुन पचन संबंधी औषध बनवण्यास त्याचा उपयोग होतो. तर आज आपण पपईचे आरोग्यसंबंधी फायदे जाणून घेणार आहोत.

>> हृदय रोगावर फायदेशीर

आपल्याला हृदयासंबंधी काही आजार झाले असतील त्याचा आपल्या जीवनावर परिणाम पडतो. बऱ्याचवेळा कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयरोगाचा धोका उद्भवतो. कारण हृदयाच्या रक्तवाहिन्यांत कोलेस्ट्रॉल जमा होते. तेव्हा हृदयासंबधी आजार होतात. पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. म्हणून पपईचे सेवन केल्याने हृदयसंबंधित आजार होण्याची संभावना कमी होते.

>> पचन शक्ती वाढते

अलीकडे लोक फास्टफूडकडे आकर्षित झाले आहेत. मात्र, सातत्याने व जास्त प्रमाणात फास्ट फूड खाल्याने अनेक प्रकारचे आजार होतात. पपईत अनेक प्रकारचे एन्झाईम्स असतात. त्यामुळे आपली पचन क्रिया चांगली होते आणि आपली पचन शक्ती वाढण्यास मदत होते. त्यात असणाऱ्या डाईट्री फायबर मुले आपल्याला ऊर्जा प्राप्त होते.

>> डोळ्यांसाठी फायदेशीर

पपई मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C असते. जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. म्हातारपणात आपली नजर कमी होते, मात्र पपईच्या नियमित सेवनाने डोळ्यांना फायदा मिळतो.

>> त्वचेसाठी लाभदायी

पपईत असलेल्या व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात. त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि व्हिटॅमिनने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. यामुळे आपले तारुण्य टिकून राहते. पपईत असलेले क्यारोटीन हे फुफ्फुस व तोंडाच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी मदत करते.