जाणून घ्या लाल भोपळा खाण्याचे ‘हे’ 5 मोठे गुणकारी फायदे !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – तुम्हाला लाल भोपळा (pumpkin )माहितच असेल. याला तांबडा भोपळा असंही म्हटलं जातं. चवीला गोड आणि पटकण शिजणारी भाजी म्हणूनही हा भोपळा (pumpkin )ओळखला जातो. परंतु अनेकजणांना हा भोपळा आवडत नाही. मात्र याचे शरीराला अनेक फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) वजन कमी करणं – अनेकजण असे आहेत जे वाढत्या वजनानं त्रस्त असतात. असे लोक भोपळ्याची भाजी खाऊ शकतात. भोपळ्यात कमी कॅलरीज असतात. याशिवाय यात फायबरचं प्रमाणंही जास्त असतं. त्यामुळं शरीरातील फॅट्स कमी होतात आणि भुकेवर नियंत्रण राहतं.

2) पचनक्रिया सुधारते – भोपळ्याचं नियमित सेवन केलं तर शरीरातील फायबरची क्षमता 11 टक्क्यांनी वाढते. त्यामुळं पचनमार्गात येणारे अडथळे दूर होतात. तसंच बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो.

3) डोळ्यांचं आरोग्य सुधारतं – भोपळ्याच्या सेवनामुळं मोतीबंदूची समस्या दूर होण्यास मदत होते. डोळ्यांचे स्नायू अशक्त असल्यास भोपळा गुणकारी ठरतो.

4) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – भोपळ्यात व्हिटॅमिन ए, ई, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. त्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

5) मधुमेहींसाठी गुणकारी – भोपळा चवीला गोड असला तरी शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.