Warm Water Benefits : उन्हाळ्यात गरम पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक, ‘हे’ 5 जबरदस्त फायदे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात सकाळी नियमित गरम पाणी प्यायल्याने अनेक लाभ होतात. सोबतच कोरोना आणि इतर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. डॉक्टर्स सुद्धा कोरोना व्हायरस महामारीपासून दूर राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. गरम पाण्याने संसर्गाचा धोका खुप कमी होतो. गरम पाणी पिणे आरोग्यासाठी कसे लाभदायक आहे ते जाणून घेवूयात…

1. कोरोना व्हायरसपासून बचाव
कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी जारी अ‍ॅडव्हायजरीमध्ये लोकांना गरम पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी सकाळी गरम पाणी प्यायले पाहिजे.

2. हंगामी आजार
उन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्याने हंगामी आजार जसे की फ्लू, खोकला, सर्दीपासून बचाव होतो. इम्यून सिस्टम मजबूत होते.

3. वजन कमी करण्यासाठी उपयोगी
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात रोज सकाळी गरम पाणी पिण्याची सवय लावून घ्या. यामुळे शरीराचे तापमान ठिक राहते, मेटाबॉलिज्म रेट वाढतो. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून सुद्धा घेऊ शकता.

4. शरीर डिटॉक्स करा
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडतात. पचनशक्ती सुधारते. लिंबयुक्त कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर काढले जातात.

5. बद्धकोष्ठतेपासून आराम
उन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.