नाष्ट्यात खा कच्चं पनीर, मजबूत हाडांसह वजन नियंत्रणात राहील

पोलीसनामा ऑनलाइन – दिवसभर ताजे आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी न्याहारी करावी. कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त कच्चे पनीर खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात निरोगी चरबी आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीर निरोगी व ऊर्जावान बनते. तर मग जाणून घेऊया इतर फायद्यांविषयी.

पनीरमध्ये पौष्टिक कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. पनीर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत करते.

मधुमेहात फायदेशीर
पनीरमध्ये ओमेगा -3 फॅटी असिडस् असते. ते मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे. नियमित कच्चे पनीर खाल्ल्याने साखर नियंत्रित होते.

हृदयरोगांपासून दूर रहा
न्याहारीमध्ये कच्चे पनीर खाल्ल्यानेही हृदय निरोगी राहते. त्याच्या सेवनामुळे लोह, कॅल्शियम, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत करते. रक्तदाब नियंत्रित राहतो.

वजन कमी होते
बरेच लोक वजन वाढण्याच्या भीतीने पनीर खाण्यास टाळाटाळ करतात. परंतु त्यामधील लिनोलिक असिडमुळे शरीरात साठवलेल्या जादा चरबी कमी होते. फायबर असल्यामुळे जास्त काळ उपासमार होत नाही. अतिरिक्त अन्न खाण्याच्या समस्येपासून मुक्तता होते व वजन नियंत्रणात राहते.

हाडे मजबूत होतात
पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. ते सेवन केल्यास स्नायू आणि हाडे मजबूत होतात. मुलांच्या आहारात याचा नक्कीच समावेश करावा. मजबूत पचनसंस्थेसाठी पनीर सेवन करावे. हे पोट संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते.

तणावातून मुक्ती मिळते
सध्या अनेकजण तणाव आणि चिंताग्रस्त आहेत. कामाच्या ओझ्यामुळे थकवा येतो. अशा परिस्थितीत न्याहारीमध्ये 1 वाटी पनीर खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे थकवा आणि तणाव दूर होतो. दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते.

पनीर प्रतिकारशक्ती वाढते
पनीर मध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे घटक असतात. केवळ प्रथिनेच नसून कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्याचे सेवन केल्याने थकवा, अशक्तपणा दूर होतो. पनीरमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आजाराचा धोका कमी होतो.