‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हिवाळा सुरु होताच आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. त्यामुळे या हंगामात आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. अशातच थंडीमध्ये सहज मिळणारे फळ म्हणजे स्टार फ्रुट. याचे सेवन हिवाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर चांगला उपाय ठरू शकते. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी मिळते. त्याचबरोबर यामध्ये पोटॅशियम, झिंक, कॅल्शिअम आणि फायबरही आढळून येते. अश्या परिस्थितीत जाणून घेऊया थंडीमध्ये स्टार फ्रुट खाण्याचे फायदे…

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी –
स्टार फ्रुटमध्ये व्हिटॅमिनी बी 9, ॲन्टी- ऑक्सिडंट आणि फोलिक ॲसिड आढलते, जे हृदयाचे आजार दूर ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

कोंड्यापासून सुटका –
हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होणे सामान्य आहे. यावर स्टार फ्रुट हा सर्वोत्तम उपाय आहे. स्टार फ्रुट आणि बदामाचं तेल एकत्र करून आठवड्यातून दोन वेळा लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. तसेच केस चमकदार आणि मुलायम होण्यासही मदत होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर –
मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन बी 6 मधील गुणधर्मांमुळे स्टार फ्रुट डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. यामुळे डोळ्यांना सूज, वेदना, पाणी येणं आणि डोळ्यांची दृष्टी कमी होणं यांसारख्या समस्या दूर होतात.

रोगप्रतिकारक शक्ती –
पोषक त्तव आणि व्हिटॅमिन सीच्या गुणधर्म असलेल्या स्टार फ्रुटच्या सेवनाने शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. ज्यामुळे शरीरामध्ये एनर्जी लेव्हल वाढण्यासाठीही मदत होते.

वाढत्या वजनावर नियंत्रण –
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर स्टार फ्रुटचे सेवन हा उत्तम पर्यंत आहे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे जाणवते आणि लगेच भूक लागत नाही. साहाजिकच तुम्ही थोडे कमी खाल्ले तर त्याचा परिणाम वजन नियंत्रणात राहते.

पचनशक्ती वाढविते –
पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी स्टार फ्रुट एक चांगला पर्याय मानला जातो. यातील फायबर बद्धकोष्ठतेची लक्षणे दूर करून जळजळ, कळ आणि अतिसार ठीक करण्यास मदत होते.