मासिक पाळीत होणाऱ्या त्रासानं वैतागलात ? सूर्यफुलाच्या बियांच्या मदतीनं दूर करा समस्या ! जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सूर्यफुलाचे असंख्य फायदे आहेत जे खूप कमी लोकांना माहित आहेत. याच्या बियांचे अनेक फायदे आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, खनिजे असतात. त्यामुळं या बिया खाण्याचे अंत्यंत महत्त्वाचे आणि गुणकारी फायदे आहेत. आज याच्या बियांचे आपल्याला कोणते फायदे होतात याची माहिती आपण घेणार आहोत.

1) भाजलेल्या किंवा खारवलेल्या सूर्यफुलाच्या बिया या शरीरासाठी जास्त फायदेशीर आहेत. जर नाष्यात याचं सेवन केलं तर शरीराला खूप फायदा होतो.

2) सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळं केसांसाठी याचा खूप फायदा होतो.

3) या बिया प्रचंड पौष्टीक असतात. त्यामुळं त्या खाव्यात. यांचा वापर आपण सलाडमध्ये देखील करू शकतो.

4) सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यानं मासिक पाळीत होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी असे त्रास कमी होतात.

5) सूर्यफुलाच्या बियांमध्ये कॅल्शियम देखील असतं. त्यामुळं या बियांचं सेवन केलं तर शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.