मासिक पाळीमध्ये खूप त्रास होतो ? सूर्यफूलाच्या बियांच्या मदतीनं करा समस्या दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – पिवळ्या रंगाचं टपोर फुललेलं सूर्यफूल अनेकांचं लक्ष वेधून घेत असते. खरे तर सूर्यफुलाचे अनेक फायदे आहेत. पण त्या पासून आपण अनभिज्ञ आहोत. सूर्यफुलांच्या बियांचा तेल काढण्यापलीकडे फारसा उपयोग नाही असे अनेकांना वाटत. मात्र, या बिया आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम, खनिजे असतात. त्यामुळे रोजच्या आहारात सूर्यफुलांच्या बियांचा समावेश केला तर नक्कीच आरोग्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. तेव्हा या बियांचा नेमका कसा वापर करता येईल हे जाणून घेऊ.

>> सकाळच्या नाश्त्याच्या वेळी भाजलेल्या अथवा खारवलेल्या सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने शरीरासाठी फायदेशीर ठरत.

>> सूर्यफुलांच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन केसांसाठी फायदेशीर ठरु शकते.

>> या बिया पौष्टिक असल्याने त्यांचा सलाड मध्ये सुद्धा वापर करुन आपण खावू शकतो.

>> सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने मासिक पाळीत होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी सारखे त्रास कमी होतात.

>> या बियांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्याने, सतत सेवन केल्यास शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरुन निघते.

( यातील कोणताही वैद्यकीय उपचार करण्याआधी आरोग्यतज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.)