Weight Gain Diet : अंडरवेट आहात आणि लवकर वजन वाढवायचंय, मग ‘या’ 5 गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  वजन कमी आणि जास्त करण्यात तुमचा डाएट सर्वस्वी जबाबदार असतो. वजन जास्त असेल तर तुमचे डाएट कंट्रोल करा, वजनावर नियंत्रण राहील. अशाच प्रकारे तुमचे वजन कमी असेल तर तुम्ही तुमचा डाएट वाढवा. अंडरवेट असल्यास डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि वसायुक्त वस्तूंचा समावेश करा. वजन वाढवण्यासाठी आहारात कोणत्या वस्तूंचा समावेश करावा ते जाणून घेवूयात…

या वस्तूंचा करा समावेश

1 बटाटा

वजन वाढवण्यासाठी डाएटमध्ये बटाट्याचा समावेश करा. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॉम्प्लेक्स शुगर असते, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

2 तूप

वजन वाढवण्यासाठी आहारात तूपाचा वापर करा. तूपात सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरीची मात्रा चांगली असते. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

3 अंडे

अंड्यात फॅट आणि कॅलरीज भरपूर असतात, हे नियमित सेवन केल्याने वजन वाढते. दिवसात कमीत कमी दोन अंडी जरूर खा.

4 केळे

केळ्यात भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे एनर्जीसह वजनसुद्धा वाढते. नाश्त्यात केळ्यासह दूध सेवन करू शकता.

5 बदाम

3-4 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी वाटून दुधात मिसळून प्यावे. एक महिन्यापर्यंत दूध आणि बदाम सेवन केल्याने वजन वाढते.