Black Fungus & Mask : मास्कमुळे सुद्धा वाढत आहे का फंगस इन्फेक्शनचा धोका?, कसा बचाव करू शकता यापासून?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत मागील महिन्यापासून कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या धोकादायक लाटेला तोंड देत आहे. या दरम्यान कोरोनासह ब्लॅक आणि व्हाईट फंगसने सुद्धा देशातील अनेक राज्यांत शिरकाव केला आहे. हे फंगल इन्फेक्शन कोविडच्या त्या रूग्णांना होत आहे ज्यांना स्टेरॉयईड दिले गेले किंवा ज्यांना डायबिटीज आहे. राजस्थान सरकारने तर ब्लॅक फंगसल एपिडेमेक घोषित केले आहे. असे म्हटले जात आहे की, अस्वच्छ मास्कमुळे सुद्धा फंगसचा धोका वाढत आहे, याबाबत जाणून घेवूयात…

मास्कमुळे सुद्धा होऊ शकतो ब्लॅक फंगस
प्रत्येक वापरानंतर मास्क स्वच्छ आणि सॅनिटाईज करणे अतिशय आवश्यक आहे. काही लोक एकच मास्क अनेक दिवस लावतात. 2-3 आठवड्यांपर्यंत एकच मास्क लावला तर ब्लॅक फंगस होऊ शकतो.

मायक्रोबायोलोजिस्टच्या रिपोर्टनुसार, बोलताना आणि श्वास घेताना मास्कमध्ये एरोसोल जमा होतात. 25 ते 35 डिग्री सेल्सियस उष्णता आणि आद्रतेमुळे फंगस तयार होऊ शकतो. प्रत्येक सहा तासांनी कोविड-19 रूग्णाने मास्क बदलला पाहिजे. अँटीसेप्टिकने धुवून आणि उन्हात ठेवल्याने फंगस मरते.

अनेक मेडिकल एक्सपर्टचे म्हणणे आहे की, जर घाणेरड्या मास्कचा वापर आणि कमी हवेशीर खोलीत राहिल्यास ब्लॅक फंगल इन्फेक्शन होऊ शकते. अनेक प्रमुख हॉस्पिटलने सांगितले की जे ब्लॅक फंगसचे रूग्ण दाखल झाले आहेत, त्यांच्यात साधारण रूग्ण आणि कोरोना रूग्ण असे दोन्ही आहेत. तपासणीत समजले की, ते मोठ्या कालावधीपर्यंत न धुताच मास्क घालत होते, ज्यामुळे त्यांना सुद्धा फंगल इन्फेक्शन झाले.