Black Fungus Symptom : कोविड-19 मधून रिकव्हर झाला आहात का ? मग दातांच्या संसर्गाच्या ‘या’ 5 लक्षणांपासून रहा सावध !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – म्यूको-मायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस (Black Fungus) हा नवीन संसर्ग नाही, स्टेरॉईड्सचा अति आणि अनावश्यक वापर, मोठ्या कालावधीपर्यंत आयसीयूमध्ये राहणे आणि अस्वच्छ परिस्थितीने रूग्णांसाठी रिकव्हरी अवघड केली आहे. सर्वात जास्त जोखीम त्या लोकांना असते, जे अनियंत्रित मधुमेहासह कमजोर इम्यूनिटीच्या समस्येने पीडित आहेत.

Pune : कुविख्यात शाम दाभाडे टोळीचा सदस्य अन् मोक्क्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

ब्लॅक फंगस (Black Fungus) संसर्गाचा सर्वात मोठा संकेत आहे – काळी पापडी तयार होणे, एका भागात पॅरालिसिस, सूज, सतत डोकेदुखी आणि गंभीर प्रकरणात जबड्याच्या हाडाचे नुकसान. मात्र, उपचार करणार्‍या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, काही असे संकेत सुद्धा असतात जे पाहून दुर्लक्ष केले जाते, जी संसर्गाची सुरूवातीची लक्षणे असतात. ज्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक असते, जसे की दातांशी संबंधीत अस्वच्छता.

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद येथून अटक; आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा केला होता प्रयत्न

ब्लॅक फंगसपासून (Black Fungus) बचावाची एकच पद्धत आहे की, याच्याशी संबंधीत सुरुवातीच्या संकेतांकडे लक्ष दिले जावे. आता तज्ज्ञ मानतात की, अशी अनेक कारणे आहेत ज्यांच्या बाबतीत बरे होत असलेल्या रूग्णांनी विशेषकरून पहिल्या 6 आठवड्यात सावध राहण्याची आवश्यकता आहे. दातांच्या या समस्यांनी पीडित लोकांना अतिशय सावध राहिले पाहिजे. हा संसर्ग अतिशय धोकादायक असू शकते. जर हे मेंदू आणि महत्वाच्या चेहर्‍याच्या मांसपेशींमूधन जाते, प्रारंभी हे जबड्याचे हाड किंवा तोंडातून श्वासाद्वारे पसरते, यासाठी दातांची स्वच्छता ठेवली पाहिजे.

कोरोनातून बर्‍या झालेल्या व्यक्तींनी या लक्षणांकडे लक्ष ठेवावे :
मोबाइल दात
मोबाइल दात होण्याचा अर्थ हा असू शकतो की, व्यक्ती हिरड्यांशी संबंधीत दाताच्या अव्यवस्थेने पीडित असते. दात सैल होण्याच्या पाठीमागे जखम आणि संसर्गासह अनेक कारणे असू शकतात. मात्र, जर तुम्ही कोरोना व्हायरसमधून बरे झाल्यानंतर अव्यवस्थित दाताने पीडित झालात तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

जीभ आणि ओरल टिशूजचा रंग बदलणे
ओरल टिशूज आणि त्यांच्या जवळपास रंग बदलल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हिरड्यांमधून पस येणे
हिरड्यांध्ये पस किंवा कोणत्याही प्रकारचा संसर्ग सुद्धा ब्लॅक फंगसची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. सफेद डाग, पस किंवा हिरड्यांमध्ये वेदना नेहमी याच्या होण्याची विशेषता असते, जेव्हा हिरड्या दातांपासून दूर होऊ लागतात तेव्हा समस्या वाढू लागते.

जबड्याच्या जवळपास वेदना होणे
म्यूको-मायकोसिसने पीडित लोकांमध्ये सुरूवातीच्या लक्षणांमध्ये वरील जबडा आणि तोंडाच्या आसपास वेदना यासारखी लक्षणे असू शकतात. डोळे लाल होणे, जबडा, डोके आणि चेहर्‍यावर वेदना होत असतील तर डॉक्टरांकडे जा.

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; जिल्हा व नागरी बँकांच्या अस्तित्वासाठी टास्क फोर्स

तोंड किंवा गाल सुन्न होणे
तोंड किंवा गालांच्या जवळपास सुन्नपणा म्हणजे बधीरता जाणावत असेल तर लक्ष द्या. मासंपेशींमध्ये अचानक कमजोरी, लाभ गळणे सुद्धा याचे लक्षण आहे.

दात स्वच्छ ठेवा
टूथब्रश डिसइन्फेक्ट करून ठेवा, हिरड्या आणि जीभेला स्वच्छ आणि निरोगी ठेवा.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !