जेजुरी : कोथळे येथे आरोग्य शिबीर संपन्न भारती हॉस्पिटलच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्यकार्ड’

जेजुुरी : पोलीसनामा ऑनलाइन ( संदीप झगडे ) – भारती हॉस्पिटलच्या वतीने पुरंदर तालुक्यातील जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्यकार्डची सुविधा देण्यात येणार असून या कार्डच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना 50 हजार रुपयांपर्यन्त मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पुणे येथील भारती हॉस्पिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अस्मिता राजेंद्र जगताप यांनी सांगितले . दि 27 रोजी कोथळे ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून भारती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या सहकार्याने कोथळे येथे सर्वरोग निदान व आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिराचे उदघाटन डॉ.अस्मिता जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे , नीरा बाजार समितीचे संचालक ॲड. धनंजय भोईटे,श्री मल्हार शिक्षण मंडळाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर भोईटे, शंकरनाना जगताप, माजी सरपंच वसंत आबा जगताप,शामराव जगताप, पी.एम.जगताप, राहुलतात्या भोसले, सरपंच शहाजी जगताप, उपसरपंच वंदना जगताप,बेलसर आरोग्य केंद्राचे डॉ.भरतकुमार शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. अस्मिता जगताप पुढे म्हणाल्या जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत ही डॉ. पतंगराव कदम यांची संकल्पना होती ,या संकल्पना पूर्ती साठी भारती हॉस्पिटल काम करीत आहे. माजी आमदार स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी पुरंदर तालुक्यात सहकार, शैक्षणिक, व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान केले आहे. त्यामुळे समाजाच्या जडणघडणीत काकांच्या कामांचा मोठा वाटा आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे यांनी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांचा सत्कार केेला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/