Covid-19 Can Spread Through Shoes : पायातील बुटांमुळं देखील फोफावू शकतो कोरोना व्हायरस ?, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जेव्हापासून कोरोना व्हायरस आला आहे तेव्हापासून लोक भीतीच्या छायेत आहेत. लोक उपाय योजना आखत आहेत जेणे करुन कोरोनापासून लोक दूर राहू शकतील. मग ते मास्क घालणे असो वा हात स्वच्छ ठेवणे असो. सर्वच जण आवश्यक ती खबरदारी घेत आहेत. त्यानंतर आता अनेक रिसर्च समोर येत आहे की ज्यातून सांगण्यात येत आहे की कोणत्या वस्तूवर व्हायरस किती वेळ टिकतो.

अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेद्वारे करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, COVID-19 कार्डबोर्डवर 24 तास राहू शकतो, तर स्टील आणि प्लास्टिकवर 3 दिवस राहतो. अनेक संशोधनात तर हे समोर आले की कोरोना व्हायरस चपलं किंवा बुटांवर 5 दिवस राहू शकतो. कारण बुटं ही चामड्याची, रबराची आणि प्लास्टिकचे तयार केलेले असता यामुळे त्यावर व्हायरस सहज राहू शकतो.

संक्रमण रोग विशेषज्ञ मैरी ई श्मिट म्हणाले की बुट चामाड्याची, रबराची आणि प्लास्टिकीची तयार केली जातात ज्यावर व्हायरस 5 दिवस जीवंत राहू शकतो.

अमेरिकी डॉक्टर जॉर्जीन नेनोस यांच्या मते, बुट संसर्गाचा एक स्त्रोत असू शकतात, विशेष करुन बाजार, रुग्णालय, ऑफिस इद्यादी ठिकाणी आपण बुट घालून जातो. तुम्ही तुमच्या घरी व्हायरस घेऊन येऊ शकतोत जर तुमची बुट तुम्ही संक्रमित ठिकाणी घेऊन जातात आणि कोणी तुमच्या समोर शिंकले तर तुमचे बुट देखील संक्रमित होऊ शकतात आणि तुम्ही देखील कोरोनाचे शिकार होऊ शकतात.

कारण बुटांंवर सर्वात जास्त घाण असू शकते किटाणू असू शकतात. मग तुमचे बुट जिथे जिथे जातील तेथे व्हायरस पोहचू शकतो. असे करत बुट हा व्हायरस तुमच्या घरापर्यंत घेऊन येऊ शकतात.

तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला व्हायरसपासून दूर ठेवण्यासाठी बाळगा ही सावधगिरी –
1. घरात जाण्यापूर्वी बुटं काढा.
2. बाजार किंवा अशा कोणत्याही ठिकाणाहून आलात तर, बुट पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवा.
3. जे बुट वॉशिंग मशीनमध्ये धुता येऊ शकत असतील ते वॉशिंग मशीनमध्ये धुवा.
4. चमड्याचे किंवा अशा एखाद्या मटेरिअलचे बुट असेल तर ते पाणी किंवा साबणाने धुवू शकत नाही अशा डिस इंफेक्टेंटने चांगल्या प्रकारे धुवा.
5. तुमच्या घराबाहेर शक्य असेल तर घरात घालायचे बुट किंवा चप्पल ठेवा. घरात हे बुट, चप्पल घालून वावरा.