Oral Health and COVID-19 : कोरोनादरम्यान दातांच्या वेदनांनी आहात त्रस्त? तर जाणून घ्या एक्सपर्टचे मत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाबाधित रुग्णांमध्ये विविध समस्या जाणवत असतात. कोरोनाबाधित रुग्णांना सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेताना त्रास जाणवतो. तर काही रुग्णांमध्ये दातांची समस्याही दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना हिरड्या किंवा दातदुखीचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे.

दातांची समस्या होण्यामागची कारणे कोणती ?

दातांची समस्या निर्माण होण्यामागील सर्वात मुख्य कारण म्हणजे जेवल्यानंतर गुळण्या न करणे किंवा गोड पदार्थ खाऊन दात साफ न करणे. त्यामुळे दातांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.

तज्ज्ञांचे मत काय?

संत परमानंद रुग्णालयातील दंत चिकित्सा विभागाचे वरिष्ठ सल्लागार आणि विभागप्रमुख डॉक्टर अनुराग भगत यांनी सांगितले की, दातांची काळजी घेणे गरजेचे असते. दातांवर म्युकरमायकोसिसचा कोणताही प्रभाव पडत नाही. म्युकरमायकोसिस इन्फेक्शन कोरोनाच्या उपचारादरम्यान दिले जाणाऱ्या स्टेरॉईडच्या अधिकच्या सेवनाने होतो. तुम्हालाही दातांची समस्या जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

अशी घ्या दातांची काळजी

दिवसातून दोनदा करा ब्रश

दातांच्या समस्येपासून वाचायचे असल्यास दिवसातून दोनदा ब्रश करणे गरजेचे आहे. एक सकाळी उठल्यावर दुसरा रात्री झोपताना ब्रश करणे गरजेचे आहे. असे केल्याने हानीकारक बॅक्टेरियापासून बचाव करता येऊ शकतो. पण ब्रश नेहमी सॉफ्ट असावा.

योग्य आहार घ्यावा

तुम्ही खूप ताजे फळे, पालेभाज्या, लीन मीट आणि कडधान्यांचा वापर करावा. त्यामुळे हिरड्या मजबूत होतात.

मीठाच्या पाण्याने गुळण्या

पाण्याने गुळण्या कराव्या. याच पाण्यात थोडसं मीठही टाकावे. त्यानंतर तोंडात गुळण्या कराव्या. मीठाचे पाणी नैसर्गिक डिसइंफेक्टेड आहे. जे दातांमध्ये अडकलेले कण काढतात. तसेच तोंड येणे, सूज या सर्वावर फायदेशीर आहे.

या गोष्टींकडे द्या लक्ष

नेहमी टूथब्रशनेच दात घासा

माउथवॉशने दिवसातून दोनवेळा गुळण्या करा.

स्टार्च आणि शर्करायुक्त जेवण टाळावे.

व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेले फळांचे सेवन करावे.

धूम्रपान करू नये

दात किंवा हिरड्यासंबंधी कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नये.

(वरील माहिती संत परमानंद रुग्णालयातील दंत चिकित्सा विभागाचे वरिष्ठ सल्लागार आणि विभागप्रमुख डॉक्टर अनुराग भगत यांच्या संवादातून समोर आली आहे.)