Covid-19 & Dengue : खरोखर ‘कोरोना’ व्हायरसच्या विरूद्ध ’संरक्षण कवच’ बनवतोय का डेंगू ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचे विश्लेषण करणार्‍या एका नव्या अभ्यासात व्हायरसचा प्रसार आणि डेंग्यूच्या तापाच्या मागील प्रकोपामध्ये एक लिंक आढळली आहे, जो मच्छरमुळे पसरणार्‍या आजाराच्या संपर्कात आल्याने कोविड-19 च्याविरूद्ध काही स्तरापर्यंत प्रतिकारशक्ती प्रदान करू शकतो.

ड्यूक विद्यापीठाचे प्रोफेसर मिगुएल निकोलेलिस, यांच्या नेतृत्वात झालेला हा अभ्यास आतापर्यंत प्रकाशित करण्यात आलेला नाही. या संशोधनात कोरोना व्हायरसच्या भौगोलिक वितरणाची तुलना 2019 आणि 2020 मध्ये डेंग्यूच्या प्रसारासोबत करण्यात आली आहे.

अध्ययन हे आढळले

प्रोफेसर निकोलेलिस यांना आढळले की, अशा ठिकाणी जेथे कोरोना व्हायरस संसर्गाचा दर कमी होता किंवा कमी संथगतीने पसरत होता, ती हिच ठिकाणे आहेत जेथे यावर्षी किंवा मागच्या वर्षी डेंग्यूने भयंकर रूप घेतले होते.

या अनोख्या संशोधनाने एका अशा शक्यतेला जन्म दिला आहे, ज्यातून समजते की, डेंगूच्या फ्लेवव्हायरस सेरोटाईप आणि सार्स-कोव्ह-2 च्यामध्ये एक प्रतिकारशक्ती क्रॉस-रिअ‍ॅक्टिव्हिटी आहे. जर हा शोध खरा ठरला, तर या कल्पनेचा अर्थ हाच होऊ शकतो की, डेंगू संसर्ग किंवा एक प्रभावी आणि सुरक्षित डेंगू वॅक्सीन काही स्तरापर्यंत कोरोना व्हायरसविरूद्ध सुरक्षा प्रदान करू शकते.

डेंगू आणि कोविड-19 व्हायरसमध्ये नाते

निकोलिस यांनी सांगितले की, याचे निष्कर्ष विशेष आश्चर्यकारक आहेत कारण मागील अभ्यासातून समजले की, ज्या लोकांच्या रक्तात डेंगू अँटिबॉडी असते, ते लोक सुद्धा कोविड अँटीबॉडी टेस्टमध्ये सकारात्मक आढळू शकतात, जरी त्यांना कधीही कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला नसेल.

हे याकडे इशारा करते की, दोन्ही व्हायरसमध्ये एक रोगप्रतिकारशास्त्र आहे, ज्याची कुणीही अपेक्षाच केली नव्हती, कारण दोन्ही व्हायरस पूर्णपणे वेगळ्या कुटुंबातून आहेत. निकोलिस यांनी हेदखील म्हटले की, या विषयावर आणखी अभ्यास करण्याची गरज आहे.