Coronavirus : डासांमुळं फोफावत नाही ‘कोरोना’ व्हायरस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं ‘स्पष्ट’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशभरात कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या वाढत असतानाच कोरोनाविषयक नवनव्या अफवांमुळे लोक भयभीत झाले आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने, कोरोनाविषयीच्या गैरजमाविषयी माहिती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात डास चावल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रसार होऊ शकत नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना व्हायरस हा खूपच सुक्ष्म असला तरी तो खूपच धोकादायक विषाणू आहे. कोरोना व्हयरस हा माणसाच्या केसाच्या तुलनेत 900 पटीने लहान आहे. असे असताना देखील याचे संक्रमण जगभरात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसचे संक्रमण जगभरातील 175 पेक्षा अधिक देशात झाले आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर आता इटली, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, भारत या देशांमध्ये विषाणूचा फैलाव झाला आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे.

कोरोना संदर्भात महत्त्वाची माहिती..

डास चावल्याने कोरोनाचा फैलाव होतो ?

भारतामध्ये हवामानात बदलाबरोबर डासांचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा दिसून येत आहे. डासांबरोबरच डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया यासारख्या इतर प्राणघातक रोगांचा प्रसार भारतात होऊ शकतो. अशा परिस्थितीत, अनेक लोकांना चिंता आहे ती डास चावल्याने कोरोना होतो का ?. यावर नुकतेच भारतीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, डास चावल्यामुळे कोरोना होत नाही तसेच त्याचा फैलाव देखील होत नाही.

कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो ?

कोरोना विषाणूचा प्रसार हा जास्त गर्दी असलेल्या परिसरात वेगाने होतो. ज्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने याचा प्रसार होतो. कोरोना विषाणू हा कोरोनाबाधित व्यक्तीच्या संक्रमीत थेंबापासून होतो. म्हणजेच तो श्वासोच्छवासाद्वारे किंवा स्पर्शाने पसरतो. शिंक किंवा खोकल्यामुळे हा विषाणू पसरतो.

कोरोना व्हायरसची लक्षणे कोणती ?

कोरोना व्हायरस हा माणसाच्या मूत्रपिंडाला हानी पोहोचवू शकतो. करोना विषाणूची लक्षणे सामान्यत: न्युमोनिया असू शकतो. यामध्ये सर्दी, घसा घवघवणे, श्वास घेण्यास अडचण, खोकला, ताप यासारखे लक्षणे दिसून येतात. ज्या व्यक्तींमध्ये अशी लक्षणे आढळून येतात त्यांना कोरोनाचा धोका खूप असतो. सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच लक्षणे असून सर्दी, खोकला श्वास घेण्यास त्रास होणे, न्युमोनिया, काही वेळा मुत्रपिंड निकामी होणे ही प्रमुख लक्षणे आढळून येतात.