Health Care | वारंवार जांभई येणे असू शकतो या ५ आजारांचा संकेत, करू नका दुर्लक्ष

0
422
Health Care | frequent yawning can be a sign of these diseases
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Care | सहसा जेव्हा आपण थकतो तेव्हा जांभई देतो. याशिवाय झोप पूर्ण झाली नाही तरी वारंवार जांभई येत राहते. जांभई येण्याची अनेक शारीरिक आणि मानसिक कारणे आहेत. थकवा, तणाव किंवा कंटाळा आल्याने जांभई येऊ लागते. (Health Care)

 

याशिवाय शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही जांभई येते. दिवसातून ३-४ वेळा जांभई येणे सामान्य आहे. परंतु, काही लोक सतत जांभई देतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. वारंवार जांभई देणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जास्त जांभई येणे हे काही गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते (Frequent yawning can be a sign of these diseases). वारंवार जांभई येण्यामागे कोणत्या समस्या असू शकतात हे जाणून घेऊया –

 

वारंवार जांभई येण्याची कारणे (Frequent Yawning Causes )

१. हृदयरोग
वारंवार जांभई येणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. संशोधनानुसार, हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारांमध्ये व्यक्तीला वारंवार जांभई येते. जर खूप जांभई येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जास्त जांभईमुळे भविष्यात दम्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे वेळेवर डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.

२. हाय ब्लडप्रेशर
हाय ब्लडप्रेशरची समस्या असेल तरी वारंवार जांभई येते. जास्त ताण घेतल्यास रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. जेव्हा रक्तदाब जास्त असतो तेव्हा मेंदूपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचत नाही. या स्थितीत जांभईतून ऑक्सिजन शरीरात पोहोचतो. हाय ब्लडप्रेशरची समस्या टाळण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करा. (Health Care)

 

३. थायरॉईड
वारंवार जांभई येणे हे हायपोथायरॉईडीझमचे लक्षण असू शकते. शरीरात थायरॉईड हार्मोनचे उत्पादन कमी होणे याला हायपोथायरॉईडीझम म्हणतात. हा एक गंभीर आजार आहे, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. वजन वाढणे, सतत थकवा जाणवणे, बद्धकोष्ठता, केस गळणे आणि चेहरा सुजणे ही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

४. लिव्हर डिसीज
जर जास्त जांभई येत असेल, तर याचे कारण लिव्हरची समस्या असू शकते. जेव्हा लिव्हर योग्यरित्या कार्य करत नाही,
तेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
जर तुम्हाला थकव्यासोबत वारंवार जांभई येत असेल तर ते लिव्हरच्या समस्येचे लक्षण असू शकते. अशी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांना भेटा.

 

५. ब्लड ग्लुकोज लेव्हल कमी होणे
जास्त जांभई येणे हे हायपोग्लाइसेमियाचे म्हणजे म्हणजे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होण्याचे प्रारंभिक लक्षण आहे.
जर मधुमेह असेल आणि वारंवार जांभई येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
जर रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी असेल, तर डोकेदुखी, थकवा, अस्वस्थता किंवा दृष्टी अंधुक होऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Care | frequent yawning can be a sign of these diseases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Immunity | हवामानातील बदलासह कमी होऊ लागते ‘इम्युनिटी’, या पद्धतीने ती वाढवा

Health Alert | रात्री होत असेल झोपमोड तर व्हा सतर्क! धोक्यात आहे तुमच्या शरीराचा ‘हा’ अवयव

Ambadas Danve | मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी