Health Care | पावसाळ्यात दुषित अन्न आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ, अशी घ्या काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Health Care | मान्सूनमुळे जरी कडक उन्हापासून दिलासा मिळत असला तरी त्यासोबतच दुषित अन्न (Contaminated Food) आणि जलजन्य संसर्गांना आमंत्रण मिळते. कावीळ (Jaundice) आणि टायफाईड (Typhoid) यांसारख्या जलजन्य आजार याशिवाय अन्नजन्य आजारांचाही गंभीर धोका वाढतो आहे. पावसाळ्यात पाणी उकळून पिणे (Drink Boiled Water), वारंवार हात धुणे आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळणे या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर (Health Care) देत आहेत.

 

पावसाळ्यात अन्न आणि जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव दुपटीने वाढतो. हवेतील वाढती आर्द्रता हे सूक्ष्मजीवांच्या वाढीचे मुख्य कारण ठरते. परिणामी अनेक रोगांचा प्रसार होतो. बहुसंख्य लोकांना कॉलरा (Cholera), टायफॉइड, आमांश (dysentery), डायरिया (diarrhea), हिपॅटायटीस ए (Hepatitis A) आणि ई, कावीळ, अन्न विषबाधा (Food Poisoning), मलेरिया (Malaria) आणि डेंग्यू (Dengue) यांसारख्या जलजन्य रोगांचा त्रास होतो. जीवाणू (Bacteria), विषाणू (Viruses)आणि परजीवींनी दूषित अन्न खाल्ल्याने देखील नोरोवायरस इन्फेक्शन Norovirus Infection (उर्फ नॉर्वॉक व्हायरस, कॅलिसिव्हायरस, व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस) सारखे अन्नजन्य रोग आढळून येतात. (Health Care)

 

उलट्या, मळमळ, ओटीपोटात दुखणे आणि ताप, थकवा आणि भूक मंदावणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ, अंतर्निहित वैद्यकीय स्थिती असलेले कोणतीही व्यक्ती शिवाय कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) असलेल्या व्यक्ती चटकन या आजारास बळी पडतात.तसेच केमोथेरपी घेत असलेल्या व्यक्तींना अन्न आणि पाण्यामुळे होणारे आजाराचा धोका जास्त असतो, असे पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील (Apollo Spectra Hospital Pune) इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट (Internal Medicine Expert) डॉ. सम्राट शहा (Dr. Samrat Shah) यांनी म्हटले आहे.

डॉ शहा पुढे म्हणाले, शौचालयातील स्वच्छता राखणे, आजुबाजुच्या पर्यावरणाचे व्यवस्थापन करणे, गरम पाणी आणि डिटर्जंट वापरून आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे आवश्यक आहे. क्लोरीन-आधारित जंतुनाशकाची निवड करा, चांगल्या वैयक्तिक स्वच्छतेची सवय लावून घेणे आवश्यक आहे. मुलांना हात धुण्याचे महत्त्व पटवून द्यावे. शौचालय वापरल्यानंतर, पाळीव प्राण्यांना हाताळल्यानंतर आणि प्राण्यांची विष्ठा साफ केल्यानंतर, स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी आणि नंतर, डायपर बदलल्यानंतर किंवा शौचालय वापरलेल्या मुलाची स्वच्छता केल्यानंतर हात स्वच्छ धुवा. खाण्यापूर्वी सर्व कच्च्या भाज्या आणि फळे धुवून घ्या.

 

टायफॉइड, हिपॅटायटीस ए, पोलिओ आणि फ्लू यांसारख्या प्रतिबंधित रोगांपासून दूर राहण्यासाठी लसीकरण करा.
मसालेदार किंवा पचायला जड अन्न खाणे टाळा. पालक, कोबी तसेच हिरव्या पालेभाज्यांचे सेवन न करणे योग्य राहिल.
जास्त वेळ ठेवलेले अन्न खाऊ नका कारण तुम्हाला अन्नातून विषबाधा होऊ शकते.
जंक फुड, तेलकट आणि हवाबंद डब्यातील अन्नपदार्थांचे सेवन टाळा.
आहारात ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्य समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला सतत उलट्या आणि जुलाब होत असतील,
तुमच्या शौचावाटे रक्त येत असल्यास, खूप ताप, चक्कर येणे किंवा ओटीपोटात असह्य वेदना,
लघवीच्या रंगात बदल होत असल्यास, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही डॉ शहा यांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- Health Care | Take care of the increase in diseases caused by contaminated food and water in the rainy season

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे महापालिकेच्या उपायुक्तांकडे सापडले एक कोटी, पुणे एसीबीकडून FIR

 

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

 

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’