Health Care Tips | जेवल्यानंतर ‘ही’ चुक करत आहात का?; आरोग्यावर होईल विपरीत परिणाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Care Tips | सध्याच्या धावपळीच्या युगात खाण्यापिण्यावर नियंत्रण असले तर आरोग्याच्या समस्या जाणवत नाहीत, महत्वाचे म्हणजे दैनंदिन आहारामध्ये जेवल्यानंतर आपल्याकडून चुका होत असतात. त्याच चुका आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. जेवणानंतर अंघोळ करणे. आपल्या रोजच्या जीवनातील अनेक सवयी आहेत, ज्या नकळतपणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. नेमक्या कोणत्या समस्या (Health Care Tips) आहेत. याबाबत जाणून घ्या.

 

‘या’ सवयी टाळा (Avoid These Habits) –

1. नाश्ता किंवा जेवणानंतर फळं खाणे (Eating Fruit After Breakfast Or Lunch) –
अनेकदा लोक नाश्ता किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच फळं खाताना दिसतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेवणानंतर लगेचच फळ खाल्याने अ‍ॅसिडीटी (Acidity) होते. (Health Care Tips)

 

2. जेवणानंतर धुम्रपान करणे (Smoking After Meals) –
काही लोकांना जेवणानंतर धुम्रपान करण्याची सवय असते. पण तुम्हाल माहित नसेल की ही सवय तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. यामुळे तुमचे वजन वाढते.

3. नाश्ता किंवा जेवणानंतर अंघोळ करणे (Taking A Bath After Breakfast Or Lunch) –
नाश्ता किंवा जेवणानंतर अंघोळ करणे ही सवय, शरीरासाठी घातक ठरु शकते. याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. या चुकीमुळे वजन वाढणे, अपचन, अ‍ॅसिडीटी (Weight Gain, Indigestion, Acidity) या आजारांना निमंत्रण मिळेल. यामुळे जेवणानंतर अंघोळ करणाऱ्या व्यक्तींनी लगेचच ही सवय बदला.

 

4. जेवणानंतर लगेच झोपणे (Go To Bed Immediately After A Meal) –
जेवणानंतर लगेच झोपणे ही मोठी चूक आहे. असं केल्याने खाल्लेलं जेवण पचत नाही. यामुळे अपचनाची समस्या उद्भवते. यामुळे जेवणानंतर काही वेळ चाला (Health Care Tips).

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Care Tips | bad habits do not bathe shortly after eating
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Morning Breakfast | एनर्जी आणि इम्युनिटीसह हॅप्पीनेस सुद्धा देतो सकाळचा नाश्ता, येथे जाणून घ्या याचे 5 फायदे

 

Amla Muramba | सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा मुरंबा खाल्ल्याने होईल आरोग्याला फायदा; जाणून घ्या

 

Weight Loss | जिद्दीच्या ’ट्रेडमिल’वर स्वार होऊन खाणे केले कंट्रोल; डॉक्टरने 2 वर्षात 194 वरून 84 किलो केले वजन